चंद्रपूर जिल्ह्यात जगणे झाले कठीण
वाघाच्या हल्यात शेतकरी जख्मी …..
*व्याहाड उपवनक्षेत्रा अंतर्गत केरोडा येथील घटाना *
* तालुक्यात डुकर ; वाघाचे हल्ले वाढले *
* परिसरात भीतीचे वातावरण *
सावली ( लोकमत दुधे )
तालुक्यातील केरोडा येथे आपल्या शेतात कापूस काढण्यासाठी गेलेल्या शेतक ऱ्यावर वाघाचा हल्ला होऊन शेतकरी गंभीर जख्मी झाल्याची घटना दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली मनोज शालिक कुमरे ३८ वर्ष असे जख्मी शेतक ऱ्याचे नाव असून तो केरोडा येथील रहीवासी होता
धान पिकाचा हंगाम संपल्याणतार कळधान्य म्हणून लाक तूळी हरबरा आदि पिक घेतले जातात सोबतच काही शेतक ऱ्या नी कापसाची पेरणी केलि त्यामुळे शेतात रब्बी पिकासह कापसाच्या पिकाचेही प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे अनेक शेतकरी , मजूर शेतात काम करताना दिसतात परंतु अनेक शेत जमीनी जंगला लगत असल्याने आणि सद्या भोवताल वाघाची दहशत असल्याने सर्वत्र भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेच्या दिवशी जख्मी शेतकरी केरोडा मोखाळा कच्यारस्ता मार्गे आपल्या शेतात कम्पारमेंट न . १५५२ मधे आई ,पत्नी आणि स्वता गेला असता कापूस काढताना या भागात दब्बा धरून असलेल्या वाघाने हल्ला केला त्याच्या सोभत कापूस काढत असलेल्या पत्नीने पतिचा ओरङन्याचा आवाज पाहुन काठिने वाघावर वार केला लगलीच वाघा घटनास्थळा वरुण पसार झाला सदर घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमीला गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भर्ती करण्यात आले पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुटकर यांच्या मार्गदर्शनात क्षेत्रासहायक आर. बी. कोडापे, वनपाल विश्वास चौधरी तथा वन कर्मचारी करीत आहेत दरम्यान तालुक्यातील वन विभागा अंतर्गत येत असलेल्या गावा लगत वन्य जीवांचा मोठा धोका निर्माण होत असून परिसरात भीतिचे वातावरण निर्माण होत आहे मागील सरत्या वर्षात वाघाने तीन लोकांना ठार केले त्यानंतर याच भागातील वाघाला जेरबंद करण्यात आले असले तरी वाघाची दहशत कायम असून सर्वत्र भीतिचे वातावरण निर्माण झाले आहे जख्मी शेतक ऱ्याच्या पश्च्यात आई , पत्नी दोन मूली असा आप्त परिवार आहे ……



