Vidarbh24News

Latest Online Breaking News

गेवरा बुज. येथे दातांच्या दवाखान्याचे उदघाटन

गेवरा बुज. येथे दातांच्या दवाखान्याचे उदघाटन …..
* सोबत फाऊंडेशन चे द्विवर्ष पूर्ती निमित्य तीन दिवशीय कार्यक्रम *
सावली ( लोकमत दुधे )
तालुक्यातील गेवरा बुज. येथे सोबत फाऊंडेशन चंद्रपूर च्या जाणीव रुग्णालयाला दोन वर्ष पुर्ण झाले त्यानिमित्य नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी दातांच्या रुग्णालयाचे व प्रयोगशाळेतील बायोकेमिस्ट्री मशीनचे उदघाटन सुमनबाई कवळू देशमुख या जेष्ठ महिला रुग्णाच्या हस्ते पार पडले.
उदघाटनसोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव पुनम झाडे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरज म्हस्के, डॉ. जानकी गुरपुडे -म्हस्के, पोलीस पाटील संजय रामटेके व वर्षा भांडेकर आशा गटप्रवर्तक अंतरंगाव यांची उपस्थिती होती,
दोन वर्षपुर्ण झाल्यामुळे 3 दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात पहिल्या दिवशी दातांच्या दवाखान्याचे व प्रयोगशाळेतील बायोकेमिस्ट्री मशीनचे उदघाटन व रात्रौ 7वाजता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भानामती, बुवाबाजी वर आधारित वैज्ञानिकप्रयोग प्रा. संजय बन्सोडे प्रधान सचिव अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य, सिनेट सदस्य इस्लामपूर विद्यापीठ जिल्हा सांगली यांनी करून दाखविले व बुवाबाजी पासून होण्याऱ्या फसवणूकपासून सावध व्हावे असं सल्ला दिला यावेळी सुयश तोशनिवाल, डॉ. राधिका शर्मा, मालतीताई ग्रामसंघ सेवाग्राम यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मोफत मोतीबिंदू व नेत्रचिकित्सा शिबीर घेण्यात आले यामध्ये 231 रुग्णांनी नोंदणी केली त्यात 217 रुग्णांची तपासणी डॉ सागर राजुरकर चंद्रपूर नेत्रचिकिस्तक यांनी केली, रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला, तिसऱ्या दिवशी सकाळी रांगोळी स्पर्धा व महिलांसाठी कबड्डी व खो -खो खेळाचे आयोजन करण्यात आले होते खो खो मध्ये गेवरा बुज तर कबड्डी मध्ये रामनगर संघांनी जेतेपद प्राप्त केले, त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती डॉ. जानकी गुरपुडे -म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. सुरज म्हस्के, रिनाताई दाजगाये, रश्मी सायरे, शारदा श्रीरामे, वनिता पांचलवार, सविता लोणारे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आले, यावेळी विजयी संघाना ट्राफी व मेडल देण्यात आले तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व पुस्तिका भेटवस्तू देण्यात आले, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरज म्हस्के, सूत्रसंचालन विवेक राऊत तर आभार किर्ती पिंगे हिने मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोबत फॉउंडेशन चे कार्यकर्ते, समन्वय समितीचे सर्व सदस्य गुरुदेव शेंडे, अजय भांडेकर, शिल्पा पाल, रमेश वाकडे, विनायक वाढणकर, अनिता मारभते, गिरीधर मारभते व प्रज्योत आभारे यांनी अथक परिश्रम घेतले ….

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!