Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोलीस आणि जनता यांच्या समन्वयातूनच गुन्हेगारीला आळा -ठाणेदार आशिष बोरकर

पोलीस आणि जनता यांच्या समन्वयातूनच गुन्हेगारीला आळा- ठाणेदार आशिष बोरकर
*पोलीस स्थापना दिनानिमित्त ,पोलीस स्टेशन सावलीचा उपक्रम *
* विजेता संघ ठरला वन विभाग *
सावली ( लोकमत दुधे )
खाकी वर्दीला नेहमीच नकारात्मक दृष्टिकोनातुन बघितल्या जाते,पण जेव्हा जेव्हाआपत्ति,आणि संकटात्मक परिस्थिति निर्माण तेव्हा खाकी वर्दीच मदतीला धावुन येते, त्यामुळे खाकी वर्दीतील पोलीस आणि जनता यांच्यात समन्वयातूनच गुन्हेगारीला आळा बसु शकतो आणि त्यामुळेच सावली सारख्या अति संवेदनशील गावात पोलिस विभागाच्या वर्धापन दिनाचे औचित्य सद्भावना कपाचे आयोजन करण्यात आले ,असे मत ठाणेदार आशिष बोरकर यांनी व्यक्त केले, ते महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्य आयोजित सद्भावना कपाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते,
पोलीस विभागाच्या वतीने सद्भावना क्रिकेट कप चे आयोजन संत नारायण बाबा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, सहउद्घाटक उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश अक्षय जगताप, तहसीलदार परिक्षित पाटील, नगराध्यक्ष लता लाकडे, नायब तहसीलदार सागर कांबळे, वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण विरुडकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष मुन्ना स्वामी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण सुरमवार, अभियंता आठवले आदि मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवसीय चाललेल्या या क्रिकेट सामन्यात पोलीस विभाग, पत्रकार मंडळ
तहसील विभाग, न्यायालय, वन विभाग, नगरपंचायत ग्रामीण रुग्णालय, व्यापारी असोसिएशन, पंचायत समिती, यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला तर वनविभाग हे विजयाचे मानकरी ठरले.
सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी आपल्या सुबक कल्पनेतून सद्भावना क्रिकेट कप चे आयोजन केले. यानिमित्ताने सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार मंडळ यांच्यात समन्वय्याचे दर्शन घडवून आणले. ठाणेदार आशिष बोरकर यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.
पोलीस विभागाच्या वतीने आयोजित सद्भावना कपाच्या यशस्वीतेसाठी पोलिस विभागाचे चिचघरे,अजय मडावी, धिरज पिदुरकर, मोहन दासरवार, बोधे मेजर, पो.शि .दुर्गे,मडावी, बंटी दुर्योधन, वाढई सह संपुर्ण पोलिस कर्मचारी, समालोचक रोशन बोरकर,नितिन दुधे ,धर्मेश बोरकर,पत्रकार लोकमत दुधे ,बाबा मेश्राम,आशिष दुधे सुधाकर दुधे, रुपचंद लाटेलवार सह सावली वासियांनी सहकार्य केले…

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!