वनमंत्री, वनविभागाला वाघाला जेरबंद यश
वनमंत्री, वनविभागाला वाघाला जेरबंद यश
चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील तिन व्यक्तीचा वाघाने बळी घेतला होता. सगळी कडे वाघाची दहशत होती. शेतकरी शेतात जाऊ शकत नव्हते कापुस वेचणी करण्यासाठी मजुर भेटत नव्हते. अशा संकट समयी वनमंत्री अँक्शन मोड मध्ये आलेले होते. वनमंत्र्याच्या आदेशप्रमाणे सावलीची वनविभागाची टीम, चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक सुध्दा खेडीला आले होते.
वनविभागाचे 100 कर्मचारी, डॉक्टर, शार्पशूटर तसेच प्रत्येक गावातील 20 लोकांची टीम असे सर्वजण वाघांच्या जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत होते. आज सकाळी 5.30 वाजता कंपार्टमेंट नंबर 502 मध्ये वाघाला जेरबंद करण्यात यश आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी पि जी विरुटकर, डॉक्टर पी एन बसेट्टी, शार्पशूटर तसेच सर्व वनकर्मचारी यांनी खुप मेहनत घेतली.



