ऍड रोशन बागडे यांच्या निवडीने वैचारिक विचाराच्या लढाईचा विजय – रणजीत मेश्राम
ऍड रोशन बागडे यांच्या निवडीने वैचारिक विचाराच्या लढाईचा विजय.- रणजीत मेश्राम
सावली ( लोकमत दुधे )
नागपूर जिल्हा बार असोसिएशन च्या निवडणुकीत ऍड रोशन बागडे यांचा विजय हा वैचारिक विचाराच्या लढाईचा विजय असून याविजयाने सामूहिक विचाराची दिशा बदलली असून येणाऱ्या निवडणुकीत प्रस्तापित पक्षांना पराभूत करण्याचे सामर्थ्य या निवडणूकीने दाखवून दिले असे वक्तव्य प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत रणजीत मेश्राम यांनी महाराष्ट्र राज्य काष्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ आणि संविधान परिवारचे वतीने नागपूर जिल्हा बार असोसिएशन च्या निवडणुकीत ऍड रोशन बागडे आणि सहकारी यांच्या विजया निमित्त हिंदी मोरभवन बर्डी येथे आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होतें, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून का ष्ट्रा इब महासंघांचे अध्यक्ष अरुण गाडे होते, या कार्यक्रमाला विशेष अतिथी ऍड फिरदोस मिर्झा तर प्रमुख अतिथी माजी संनदी अधिकारी किशोर गजभिये,आल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मधुकर उईके, प्रा राहुल मुन,ओबीसी महासंघाच्या इंजि. सुषमा भड, बहूजन चळवळीचे विश्लेषक प्रा रमेश पिसे, कॉ राजेंद्र साठे विचार पिठावर विराजमान होते, पुढे बोलताना तें म्हणाले ऍड रोशन बागडे यांच्या विजयाने येणाऱ्या पुढील निवडणुकीत लढण्याचे बळ मिळाले आहे.अध्यक्षीय भाषणात अरुण गाडे यांनी आमच्या मतावर निवडून येणारे आमचेच शोषण करतात म्हणून बदल घडवायचा असेल तर ओबीसी, आदिवासी, भटके विमुक्ताना एकत्र आणून राजकीय परिवर्तन करणे श्यक्य आहे, ऍड रोशन बागडे यांनी मिळ विलेल्या विजयातून सिद्ध झाले त्यासाठी समाजात बंधुभाव निर्माण करणे व समाजात ऐक्य घडवून आणण्याची प्रक्रिया आम्ही शिक्षक निवडूणुकीच्या माध्यमातून सुरु केली आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी ऍड मिर्झा म्हणाले, नागपूर जिल्हा बार अससोसिएशन च्या निवडणुकीत पारंपरिक निवडणूकीचे संदर्भ बदलून सर्व घटक एकत्र आले आणि 145वर्षातला ऐतिहासिक विजय प्राप्त केला. या निवडणूकीने समाजात ऐक्य घडण्याची प्रेरणा निश्चित मिळेल असे मत व्यक्त केले.पारंपरिक निवडणूकित जातीपातीला प्राधान्य दिले जाते म्हणून जातीपतीचे राजकारण संपुस्टात आणायचे असेल तर जातीचं राजकारण करणाऱ्याना पराभूत करण्यासाठी परिवर्तनाचा विचार समाजात रुजवावा लागेल, तरच बदल होऊ शकतो असे मत किशोर गजभिये यांनी व्यक्त केले.संविधान परिवाराचे प्रा राहुल मुन यांनी आम्ही सामाजिक संघटनानी सयुक्त पणे सुरु केलेल्या लढाईच मूर्त स्वरूप रोशन बागडे यांच्या विजयाने समाजाच्या ऐक्याची सुरुवात झाली असे मत व्यक्त केले काष्ट्राइब च्या पुढाकारणे सुरु केलेल्या व सर्व सामाजिक संघटनानीएकत्र येऊन एकजुटीची हाक दिली आहे, आणि सुषमा भड यांच्या शिक्षक निवडणुकीतील उमेदवारीमुळे त्याला प्रतिसाद मिळत आहे. आता समाज परिवर्तनाची लढाई समाज जोडो मधे परिवर्तीत करणे आवश्यक असल्याचे मत प्रा रमेश पिसे यांनी व्यक्त केले.सुषमा भड यांनी मनुवादी व्यवस्था हिच शोषण करणारी व्यवस्था आहे. त्यासाठी राजकीय बदल घडवून आणले तर सामाजिक बदल निश्चित पणे होईल असे मत व्यक्त केले. राजेंद्र साठे यांनी सरकार कर्मचारी व वंचित समजावर अन्याय करीत आहे म्हणून सरकारला धडक भरणारे आंदोलन उभे करण्यासाठी समाजाने पुढे यावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन धर्मेश दुपारे, भूमिका श्यामराव हाडके, तर आभार रवी पोथारे यांनी केले. याप्रसंगी ऍड रोशन बागडे यांचा शाल मोमेनतॊ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवारंचे हस्ते सत्कार करण्यात आला. सोबतच नागपूर जिल्हा बार अससोसिएशन च्या नूतन पदाधिकारी यांचा सत्कार ट्राफि व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.याप्रसंगी बानाई चे राहुल परूळकर, राजेश ढेंगरे, छाया खोब्रागडे, अब्दुल पाशा, जनार्दन मुन, डाँ जय गाडे, सुगत रामटेके अरुण साखरकर, ऍड हशू मेश्राम, ऍड बाबुलाल मेश्राम, सिद्धार्थ उके,सुधीर भगत, रणजीत रामटेके,विनोद मेश्राम, संजय रामटेके व मोठया संख्यने उपस्थित होते ……



