कापसी येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न
आझादीका अमृत महोत्सानिमित्त सावली विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने व्याहाड खुर्दच्या ग्रामपंचायत कार्यालयात कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. या शिबिराला सावली विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष एडव्होकेट धनंजय आंबटकर,तालुका बार असोसिएशनचे सचिव एडव्होकेट आदर्श गेडाम विधी सेवा समिती सदस्य डॉ. शडाकांत कवठे कापसीच्या उपसरपंच शारदा कोहळे, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. स्वतः मध्ये कोणत्या प्रकारचे परिवर्तन आणल्यास गुन्हा व गुन्हेगारीपासून अलिप्त राहण्यास मदत होईल यावर अडव्होकेट धनंजय आंबटकर यांनी मार्गदर्शन केले. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.



