बिबट्याच्या शिकार प्रकरणाचा चौवीस तासात लावला छडा,19 शिकारी अटकेत
का
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या व्याहाड खुर्द उपवनातील बीट शीर्शी नियतक्षेत्र 1534 साखरी माल येथे नुकताच रानडुक्कराची शिकार करण्यासाच्या उद्देशाने लावलेल्या जाळीत बिबट्या चा अडकुन मृत्यू झाला ,हि माहिती वनपरिक्षेत्राला मिळतात वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे , यांनी विभागीय अधिकारी सोनकुसरे यांनी कळवुन घटनास्थळी वन कर्मचारी टिम घेऊन दाखल झाले , बिबट्या चा मृत्यू झाला, त्यामुळे याचा तपास करण्यासाठी चक्रे फिरवून नेमकं जाळे कशासाठी लावण्यात आली याची चौकशी करून 19 आरोपींना अटक करण्यात आली.
यात भोजराज ठाकुर, सुखदेव बांबोळे, आकाश कुमरे, नरेंद्र भोयर, सावजी उराडे, श्रीधर गेडाम,दवरथ गेडाम, विवेक आवळे, ठाकुर, रमेश भोयर, राजू भोयर, प्रमोद भोयर,देवराव बांबोळे ,सत्यवान गेडाम सर्व रा.शिर्शी तर तुळशीराम भोयर, भाऊजी भोयर, किशोर भोयर, पुरुषोत्तम सोयाम आदी रा.पेठगाव यांच्या वर वन्यजीव अधिनियम कायदा ,कलम 2,9,39, आणि 51 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली .
हि कारवाई विभागीय वनाधिकारी सोनकुसरे, वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे , w.p.s.i प्रतिनिधी उमेशसिंग झिरे तसेच या संपूर्ण कारवाई मध्ये श्री बुरांडे क्षेत्र सहा.व्याहाड,श्री व्ही.सी.धुर्वे ,क्षेत्र सहा.सावली,भोयर,क्षेत्र सहा.पेंढरी, तसेच वनरक्षक श्री, गेडाम,श्री चौधरी, श्री नागरगोजे,श्री नागरे, श्री पाडवी आदीनी सहकार्य केले,
सहा महिन्यांपूर्वी कापसी वाघ शिकार प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आली होती , आता नियत क्षेत्र साखरी माल मध्ये जाळे लावण्यात आले त्यात बिबट्या च्या मृत्यू ने वनविभागात खळबळ माजली असून नेहमीच या क्षेत्रात शिकार केली जाते की शेताच्या होणा-या नुकसानासाठी जाळी लावण्यात येत हा प्रश्न अंधातरी असतानाच मात्र वन्यजीव बिबट्या चा मृत्यू प्रकरण वनविभागात जिव्हारी ,व असंतोष निर्माण करणारा आहे.
पण यात पुढील तपास सुरू आहे



