Vidarbh24News

Latest Online Breaking News

*कवठी येथे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट* *कारवाई करण्यास आरोग्य विभागाची टाळाटाळ*

*कवठी येथे बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट*
*कारवाई करण्यास आरोग्य विभागाची टाळाटाळ*

तालुक्यातील कवठी या गावात मागील अनेक वर्षापासून बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुरू आहे. मात्र अशा बाबीची दखल घेण्याकरता निवेदने देऊनही बोगस डॉक्टरावर कारवाई करण्यास तालुका आरोग्य विभागाकडून टाळाटाळ केल्या जात आहे. भविष्यात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू नये म्हणून गावकऱ्यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शासन स्तरावरून आरोग्य विभागावर लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टराकडून उपचार केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा बोगस डॉक्टरांवर आळा बसावा म्हणून कवठी येथील नागरिकांनी सावली तालुका आरोग्य अधिकारी यांना अनेकदा निवेदने सुद्धा दिली. परंतु अजून पर्यंत कवठी येथील बोगस डॉक्टरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. बोगस डॉक्टरांचा व्यवसाय राजरोसपणे सुरूच आहे. अशा गंभीर बाबीकडे दुर्लक्ष का करण्यात येत आहे हे न समजणारे कोडेच आहे.
कवठी गावात दोन बोगस डॉक्टर आपला व्यवसाय थाटून बसलेले आहेत. गावातच उपचार होत असल्याने येथील नागरिक शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यास तयार नसल्याने भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. याची दखल घेत नागरिकांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी मागील सप्टेंबर महिन्याच्या ग्रामसभेत ठराव सुद्धा घेतला. त्या ठरावाची सत्यप्रत तालुका आरोग्य अधिकारी याकडे देण्यात आली. परंतु आज पर्यंत बोगस डॉक्टरांवर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने गावकऱ्यांमध्ये तालुका आरोग्य अधिकारी प्रती रोष व्यक्त केल्या जात आहे. अशा गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कवठी येथील बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
…………………..

कोट –
संबधीत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या वर कारवाई केलेली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु व्यवसाय सुरू असेल तर पोलिसात तक्रार नोंदवून कारवाई करू.
डॉ. धनश्री मर्लावार तालुका वैद्यकीय अधिकारी सावली .

कोट:

गावातील जनतेला त्या बोगस डॉक्टर कडून कोणत्याही प्रकारची जीवित हानी होऊ नये या करिता सप्टेंबर महिन्यात ठराव मंजूर करण्यात आले आणि त्याची सत्य प्रत तालुका आरोग्य अधिकारी सावली यांचे कडे दिले परंतु महिना लोटून सुध्दा गेले असून कार्यवाही काहीच नाही.

सौ कांताबाई बोरकुटे सरपंच ग्रामपंचायत कवठी

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!