गायत्री रंगभूमीचे उद्घाटन
काल दिनांक 31.08.2022 रोजी दुपारी 2 वाजता हटवार कॉम्प्लेक्स देसाईगंज/वडसा येथे गायत्री रंगभूमीचे थाटात उद्घाटन झाले असुन मा.रमेश भेंडारे साहेब मुरवाडी यांचे हस्ते नटेश्वराच्या मूर्तीचे पुजन करण्यात आले तर उपस्थित गायत्री रंगभूमीचे मार्गदर्शन जेष्ठ कलावंत मा.कैलाश शेंडे सर यांचे हातुन फित कापुन रितसर उद्घाटन करण्यात आले. त्यावेळेस निर्माता.सिध्दार्थ कोवले, गायत्री रंगभूमीचे दिग्दर्शक.संदेश आनंदे, सूत्रधार प्रा.संतोष बारसागडे, संजीव रामटेके, परमानंद ऊईके, उमा वाढई ,सुभाष मसराम, मंगेशकुमार ,रुपालीताई खोब्रागडे,शुद्धोधन खोब्रागडे, प्रतिक रामटेके, गिरीधर नाकाडे वासेरा , लिलाधर कोवले वासेरा ,इंजि.अमर रामटेके ,मुकरुजी बन्सोड रामाळा ,शंतनु कुळमेथे तसेच नाट्यमंडळ चे काही सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. गायत्री रंगभुमीची दमदार सुरुवात झाली असून यात उत्कृष्ट दर्जेदार नाटके अंधारलेल्या वाटा , नशिब ,वादळ, अग्णीकुन्ड, चिन्गारी अशी एकापेक्षा एक सरस सामाजिक,कौटुंबिक ,प्रबोधनात्मक नाटके सादर होणार आहेत. तरी रसिक मायबाप प्रेक्षकांनी या नाटकांचा पुरेपुर लाभ घ्यावा असे आवाहन गायत्री रंगभूमीचे सूत्रधार प्रा.संतोष बारसागडे (7020492799) यांनी केले आहे



