अल्पवयीन मुलांच्या हातात बाइक…….
•वणी वाहतूक पोलीसांची पालकांवर कारवाईची शक्यता…
•नविन मोटार कायद्यातील नियमानुसार पालकांवर नक्कीच कारवाई होऊ शकते.त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांकडे वाहने देऊ नये.” – संजय आत्राम( ए.पी.आय. वाहतूक शाखा,वणी)
वणी (16.मे) :- उन्हाळी वर्गाच्या नावाखाली असो की लग्नाचा धूम धडाका या समस्त बाबींमुळे पालकांकडून सर्रास अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने सोपवली जातात. त्यामुळे अपघाताचा धोका तर आहेच पण वणी वाहतूक पोलिसांच्या कारवाईला देखील सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हणून खेळण्याची गाडी हाती देण्याच्या वयात मुलांच्या हाती बाइक सोपवणे पालकांसाठी अडचणीचे ठरू शकते. नवीन मोटार वाहन कायद्यात कठोर तरतुदी असून यामुळे पालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा कारवाईचा ससेमिरा मागे लागू शकतो.
त्यामुळे पालकांनी आपली जबाबदारी ओळखून आपल्या अल्पवयीन मुलांना हाती देण्याचे टाळावे .शिवाय मुलांचे वय 18 वर्षे झाल्यानंतर कायदेशीर अडचणीही वाढू रीतसर परवाना घेऊन तसेच वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यानंतरच मुलांचा हाती बाईक दिली पाहिजे.
अल्पवयीन मुलांना हातात वाहने आल्याने धोका निर्माण झाला आहे. शिवाय कायदेशीर अडचणी खूप वाढू शकतात.अल्पवयीन मुलांना प्राणांतिक अपघात झाल्यास मुलांच्या पालकास तुरुंगवास देखील होऊ शकतो. म्हणून पालकांनी योग्य ती काळजी घेतली .
नवीन मोटार वाहन कायदयात दंडात्मक तसेच तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या हाती वाहन देण्याचा हट्ट पुरवताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

“विदर्भ 24 न्यूजला “वणी वाहतूक शाखेच्या प्रमुखानी दिलेली मुलाखत
वणी वाहतूक शाखेकडून जाहीर आवाहन.लहान मुलांना वाहने देऊ नका……..
“शक्यतो अंतर्गत रस्त्यावर अल्पवयीन मुले रेसर वाहन चालवित असतांना आढळतात.आधी त्यांना समज दिली जाते. नविन मोटार कायद्यातील नियमानुसार पालकांवर नक्कीच कारवाई होऊ शकते.त्यामुळे पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांकडे वाहने देऊ नये.” – संजय आत्राम( ए.पी.आय. वणी वाहतूक शाखा,वणी)



