जून्या कामगारांना तात्काळ कामावर घ्या..अन्यथा उग्र आंदोलन…
•उपविभागीय अधिकारी यांना घातले साकडे…
वणी (26 एप्रिल) :- गुप्ता कोलवाशरी येथे जुन्या कामगारांना सेवेत तात्काळ रुजू करून घ्यावे, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा या बाबतचे निवेदन दिनांक 26 एप्रिलला माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी उपविभागीय अधिकारी डॉ शरद जावळे यांना दिले व प्रतीलिपी पोलीस निरीक्षक (वणी ), कामगार आयुक्त (अमरावती) व गुप्ता कोलवाशरी प्रशासनाला पाठविण्यात आले आहे.


अनेक कामगार गुप्ता कोलवाशरी येथे पूर्वी कामावर होते परंतु २०१२ मध्ये जेव्हा कोलवाशरी बंद झाल्या त्यावेळेस या कामगारांना कामावरून बंद करण्यात आले होते आणि ज्यावेळेस कोल वाशरी चालू होईल त्यावेळेस “तुम्हालाच आधी प्राधान्य देण्यात येईल…”” असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु कोलवॉशरी प्रशासन नवीन कामगारांना पहिले प्राधान्य देत जुन्या कामगारावर कंपनी अन्याय करीत आहे.

या कामगारांवर होणारा अन्याय कदापी सहन करणार नाही आणि येत्या 7 दिवसात जर गुप्ता कंपनीने या जून्या कामगारांना कामावर घेतले नाही तर मी (तारेंद्र बोर्डे) स्वत: कामगारांना घेऊन मेन गेटसमोर आंदोलन करनार याची सर्वस्वी जबाबदारी कोलवॉशरी प्रशासनाची राहील.
यावेळी निवेदन देताना माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व समस्त जुने कामगार उपस्थित होते.



