Vidarbh24News

Latest Online Breaking News

भाजप तर्फे राज्य सरकारच्या कारभाराचा निषेधार्थ भव्य राज्यव्यापी कंदील आंदोलन.

•आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांचा नेतृत्वात अनेक वणी पदाधिाऱ्यांनीही लावली हजेरी….

वणी ( 26 एप्रिल) :- सध्या राज्यात कोळशाची टंचाई आहे. कोळशाची टंचाई असल्याने भारनियमनाला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक तास विद्युतपुरवठा खंडीत होत आहे. आता याविरोधात भाजप आक्रमक झाले असून वणी कर्तव्यदक्ष आमदार  संजिवरेद्दी बोदकुरवार यांचा नेतृत्वात काल दिनांक 25 एप्रिलला टिळक चौकात भव्य कंदील आंदोलन करण्यात आले.

भाजपा कार्यकर्ते शहरातील टिळक चौकात राज्य सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ कंदील घेऊन उभे राहले. वीजटंचाईच्या समस्येला राज्य सरकारच जबाबदार असून राज्यात अघोषित भारनियमन सुरूच आहे. दीड तासांपासून सहा तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशातून सुरू केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे कंदील आंदोलन पुकारण्यात आले. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आणणाऱ्या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे हजारो कार्यकर्ते राज्यभर वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक देतील, व देखभाल दुरुस्तीच्या फसव्या कारणाखाली लादलेले भारनियमन संपूर्ण मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी घोषणा भाजप च्या वतीने  करण्यात आली.

या आंदोलन चे  नेतृत्व आमदार संजयरेड्डी बोदकुरवार, जिल्हा माहमंत्री रवि बेलुरकर, दिनकर पावडे,विजय पिदुरकर, माजी सभापती  संजय पिंपळशेंडे, तालुका अध्यक्ष गजानन विधाते, शहर अध्यक्ष श्रीमंत पोटदुखे, संतोष डंभारे, राकेश बुग्गेवार, कैलास पिपराडे, मंजु डंभारे, नितिन वासेकर, नंदकिशोर दरवे,सचिन खाडे,संदिप बेसरकर, शुभम गोरे,लवली लाल,सुधीर साळी,अरुण कावटकर, मनोज सरमुकदम,गणेश धानोरकर, आशिष डंभारे,गुरुदेव चिडे,सत्तेजीत ठाकुरवार, आरती वांढरे,स्मिता नांदेकर, प्रती बिडकर,संध्या लोडे,रजनि हिकरे,उषा डुकरे, इत्यादी पदाधिकारी  सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!