Vidarbh24News

Latest Online Breaking News

गर्भवती महिलेची हत्या की आत्महत्या ? प्रकरणात ५ व्यक्तींवर गुन्हे दाखल

गर्भवती महिलेची हत्या की आत्महत्या ? प्रकरणात ५ व्यक्तींवर गुन्हे दाखल

आपल्या विदर्भ 24 न्युज पोर्टलवर काल लावलेल्या “गर्भवती महिलेची हत्या की आत्महत्या” या मथळ्याची बातमी लावली होती. आज गर्भवती महिलेच्या हत्या की आत्महत्या प्रकरणात ५ व्यक्तींवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केलेले आहे. सविस्तर असे की, सावली तालुक्यातील जिबगाव येथील सुरेश मेश्राम यांची कन्या लोभिना ही सात महिन्याची गर्भवती होती लोभिता तिच्या घरातून बेपत्ता आहे हि बातमी तिच्या घरच्यांना पुतणीकडून माहिती झाली.लोभिना शोध घेतला असता ती बापुजी हूलके यांच्या शेतातील विहिरीत आढळून आली. विहिरीतून काढल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करायला पाहिजे. शवविच्छेदन न करता पोलीस विभागाला न कळविता अंतविधी पार पाडण्यात आला.ही बातमी परिसरात सर्वत्र पसरली. सदर प्रकरण मिटविण्याचा कसोसीने प्रयत्न करण्यात आला मात्र आपल्या मुलीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप मुलीच्या आई-वडिलाचा होता. मुलीच्या आई-वडिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांची भेट घेऊन प्रकरण सांगितले तसेच पाथरीचे ठाणेदार योगेश घारे जिबगाव येथे जाऊन मृतकांच्या आई-वडिलाची भेट घेतली. घटनास्थळी पंचनामा करून प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अनुज तारे  यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरीचे ठाणेदार योगेश घारे करीत आहेत. यादरम्यान मृतक लोभिनाचे सासू, सासरे जवळचे तीन नातेवाईक असे एकूण ५ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती ठाणेदार योगेश घारे यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरु आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!