मुल शहरात आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
मुल शहरात आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
मूल शहरातही आता पहिला कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, मूल पंचायत समितीच्या मागे राहत असलेला हा 30 वर्षीय युवक असून तो गुडगाव (हरीयाना) येथून आलेला होता. प्रशासनाने त्याला होऊन होम काॅरणटाइन केले होते. त्याचे स्वॅब नमुने घेण्यात आले, त्यात तो पॉझिटिव्ह आढळल्याने मूल शहरातील पहिल्या पद्धतीत रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्हाधिकारी यांनी रेड झोन मधून आलेल्या सर्वांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश दिले असले तरी, या युवकाला शहर प्रशासनाने गृह विलगीकरण आत ठेवले होते. हा युवक घरातच राहत होता, मात्र त्यांचे कुटुंबीय बाहेर फिरत असल्याने मूल शहरात आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
या युवकाचे संस्थात्मक कारणन्टाईन न करता होमकारणटाईन का केले?कोणाच्या आदेशाने केले? हा ही आता चर्चेचा विषय बनलेला आहे.
हरियाणातील गुडगाव येथून आलेल्या चंद्रपूर जिल्हयातील मुल येथील तीस वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २५ झाली आहे.
२५ मे रोजी हरियाणातील गुडगाव येथून सदर व्यक्ती नागपूरला विमानाने आले. नागपूर वरून स्वतःच्या वाहनाने मूल येथे आल्यानंतर त्यांना गृह अलगीकरण करण्यात आले. 3 जून रोजी गृहअलगीकरणामध्ये असताना त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज तो पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांचे देखील आज स्वॅब घेण्यात येणार आहे. सदर व्यक्तीला चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) व २४ मे ( एकूण रूग्ण २ ) २५ मे ( एक रूग्ण ) ३१ मे ( एक रुग्ण ) २जून ( एक रूग्ण ) ४ जून ( एक रुग्ण )अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २५ झाले आहेत.आतापर्यत २२ रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २५ पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या आता ३ आहे.



