Vidarbh24News

Latest Online Breaking News

लोणवाही गावातील नागरिक पाण्याविना तहानलेली

लोणवाही गावातील नागरिक पाण्याविना तहानलेली

कुणाल उंदिरवाडे/ विदर्भ 24 न्युज

ग्रामीण प्रतिनिधी, सिंदेवाही

 

सिंदेवाही तालुक्याला लागून असलेल्या लोनवाही ग्रामपंचायत मध्ये अंदाजे- ३५०० लोकसंख्या असून त्यांना पिण्याच्या पाण्याची खास व्यवस्था दिसुन येत नाही आहे.वार्ड क्रमांक दोन मध्ये पिण्याचे पिण्यासाठी दोन जलकुंभाचे निर्मिती केली असून काही वर्षापासून दोन्ही जलकुंभ बंद असल्याने पाणीपुरवठा होत नसून स्थानिक जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाण्याची उपलब्धता होत नसल्याने जनतेला हातपंप व विहीरच्या पाण्याच्या सहारा घ्यावा लागत आहे.
सध्यास्थितीत पाण्याची पातळी खाली गेल्याने विहिरीतून निघणारे पाणी १००% शुद्ध नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तेव्हा लोनवाही ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने याची दखल घेऊन त्वरित शुद्ध व निर्जंतुकीकरण पाण्याचा पुरवठा जनतेला देण्यात यावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
ग्रामपंचायत च्या वतीने वार्ड क्र.-२ मधे सौर उर्जेवर चालणारी मशीन बसवली असून त्याद्वारे फायबर टॅंक मध्ये पाणी जमा करून नंतर जनतेला पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात होते. परंतु सोलर बंद असल्यामुळे पाणी पुरवठा बंद आहे.
तसेच वार्ड क्रमांक चार मध्ये अंदाजे दोन वर्षापूर्वी पाणी एटीएम मशीन बसवले होते. परंतु मागील वर्षभरापासून ती बंद आहे.
कृपया ग्रामपंचायत प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन सामान्य जनतेला पिण्यासाठी शुद्ध व निर्जंतुक पाणी मिळेल याची उपाययोजना करावी. किंवा ग्रामपंचायत मार्फत टँकरद्वारे प्रतेक वार्डा मधे पाणी उपलब्ध करून द्यावे.
अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!