राजूर फाट्यावरील दोन्ही पेट्रोलपंप सामान्य जनतेस पेट्रोल देण्यास असमर्थ… (पेट्रोलपंप धारकांच्या बेजबाबदार पणा उघड़)
▪️पेट्रोल नसल्याचा साधा फलक ही लावला जात नाही
▪️ जीवघेणा रस्ता ओलांडून वाहनधारक परत येतो खालीहाथ…
राजूर( 5. एप्रिल ) : भारत सरकारने जनतेच्या सेवेसाठी स्थापित केलेले पेट्रोलपंप आज जनतेसाठीच निकामी ठरत आहे.वणी तालुक्यातील राजूर फाट्यावर 1 नव्हे तर 2 पेट्रोलपंप जनतेच्या सेवेसाठी गेल्या 1 ते 2 दशकापासून उभारलेले आहेत,पण ते नेहमी जनतेची दिशाभूल करत आहे.परिसरातील जनतेने या पेट्रोलपंपावर पेट्रोल मिळत असल्याची जणू आशाच सोडून दिली आहे.
पेट्रोल उपलब्ध नसल्याचे संकेत चिन्ह नाही


भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम नावाचे अशे 2 पेट्रोलपंप राजूर फाट्यावर स्थापित होताच ,राजूर गावात तसेच राजूर पंचक्रोशीत आनंदाची लाट पसरली होती,पण अवघ्या काही दिवसातच या पेट्रोलपंपाने आपले खरे रूप दाखविणे सुरू केले,कधी पेट्रोल असून सुद्धा पेट्रोल उपलब्ध नसल्याचे उडवा-उडवीचे उत्तरे या मुजोर कर्मचारी वर्गा कडून सामान्य जनतेस दिले जाते.
पेट्रोल पंप नावसाठीच का? डिझल पम्प नामकरण करावे गावातील नागरिकात रोष चर्चा …


मग हे पेट्रोल कुणास पुरविले जाते?
किरकोड पेट्रोल विक्रीवर जास्त नफा नसल्याने पेट्रोल हे थेट ठोक विक्री करणे योग्य आहे का?
हे पेट्रोलपंप भांडवलदार कंपन्या चालविण्यासाठी फक्त डिझेल विक्री करीताच स्थापित करण्यात आले आहे का?
मास्कविनाच कर्मचारी…नियमाची पायमल्ली


मग सामान्य जनतेने राजूर फाट्याहून ते चिखलगाव हद्दीपर्यंत गाडीला धक्का मारत जायचं का?असे प्रश्न सामान्य जनतेकडून विचारले जात आहे.
पेट्रोलपंप वरील या मुजोरी विरुद्ध आजपर्यंत अनेक सामान्य नागरिकांचा याबाबत वाद होत राहिले आहे,तरी हे पेट्रोलपंप प्रशासन मानायला तैयार नाही.
पेट्रोलपंप वर पेट्रोल तर राहतच नाही,ही बाब अवघ्या राजूर परिसरातील लोकांना माहीतच आहे,म्हणून ते या पेट्रोलपंप वर जातच नाही पण ही बाब माहीत नसलेला एखादी नवखा व्यक्ती हा जीवघेणा रस्ता पार करून या पेट्रोलपपंवर जातो पण साधा पेट्रोल नसल्याचा फलक लावले नसल्याने निराश होऊन मनस्थाप सहन करत समोर चिखलगाव हद्दी तील ccr किंवा रिलायन्स पेट्रोल पंप वर जावे लागते.
कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केले आहे,त्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क चा वापर करणे अनिवार्य आहे,पण या पंप वरील कर्मचारी मार्फत हे नियम पायदळी तुडविले जात आहे.कुणीच मास्क परिधान करून दिसत नाही.
जे पेट्रोलपंप सामान्य जनतेच्या उपयोगी पडत नाही ते काय कामाचे? त्यास शासनाने कारवाही करून बंद पाडले पाहिजे,किंवा जबाबदार प्रशासकाकडे ते सोपविण्यात यावे अशी सार्थ अपेक्षा सामान्य जनता करीत आहे.
प्रशासन याप्रकरणी काय कार्यवाही करते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.




