Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच डॉ.पद्माकर मत्ते यांच्यावर धारदार शास्त्राने हमला करणाऱ्या 4 हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या….

 

★वणी पोलिसांचा कामगिरीवर चौफेर कौतुक…

★ वणीतील ठाणेदार वैभव जाधवची चानाक्ष योजना कामी आली.

 वणी (6 एप्रिल ) :–  डॉ .मत्ते यांचावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करणाऱ्या चारही आरोपींना अवघ्या काही तासांतच पोलिसांनी अटक केली आहे. रामपुरा वार्ड येथे निवास्थान व दवाखाना असलेल्या डॉ. पद्माकर मत्ते यांच्या क्लिनिकमध्ये रुग्णाचे सोंग घेऊन आलेल्या चार युवकांनी काही कळायच्या आत डॉ. मत्ते यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जख्मी केले.

धारदार शस्त्राने शरीरावर घाव घातल्याने रक्तबंबाळ झालेल्या डॉ. मत्ते यांना आधी शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर नंतर त्यांना नागपूर येथे रेफर करण्यात आले. जुनी खद मनात ठेऊन अमर हनुमान पेंदोर याने आपल्या अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने हा हल्ला करून डॉ. पद्माकर मत्ते यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार सुमित पद्माकर मत्ते (३५) रा. रामपुरा वार्ड यांनी पोलीस स्टेशनला नोंदविली आहे. रुग्णाला उपचाराकरिता आणल्याचा बनाव करून डॉ. पद्माकर मत्ते यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना आज ५ एप्रिलला दुपारी १ वाजता घडली. या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले. डॉ. मते यांना काही कळायच्या आत शस्त्राने एकामागून घाव देण्यात आल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले.

त्यामुळे दवाखान्यात एकच गोंधळ उडाला. दवाखान्यातील गोंधळ ऐकून वरच्या मजल्यावरून खाली आलेल्या त्यांच्या सुनेला एक युवक जोराजोऱ्याने ओरडून अन्य सहकाऱ्यांना डॉक्टरांना मारण्यास सांगत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोर युवकांनी तेथून पळ काढला. हल्लेखोरांपैकी एक युवक “इसने मेरे भाई को मारा” असा बरळत असल्याचे सुनेने सांगितल्यानंतर डॉ. मत्ते यांचा मुलगा सुमित मत्ते याला अमर हनुमान पेंदोर याच्यावर संशय आल्याने त्याने तशी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच या प्रकरणाचा छडा लावत हल्लेखोर युवकांना ताब्यात घेतले.

ते ज्या दुचाकीने आले होते ती दुचाकी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अमर हनुमान पेंदोर (२८) रा. रंगनाथ नगर, सुप्रीम मिलिंद उमरे (२३) रा. भालर वसाहत, शुभम ओमप्रकाश खांडरे (२५) रा. लालगुडा, प्रज्योत महेश उपरे (१९) रा. सिंधी कॉलनी यांचा समावेश असून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३०७, ३४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आकाश हनुमान पेंदोर या तेवीस वर्षीय युवकाचा १८ जानेवारीला मृत्यू झाला. आकाश पेंदोर हा अमर पेंदोरचा लहान भाऊ आहे. आकाश पेंदोरला पोटात मळमळ वाटत असल्याने त्याला डॉ. पद्माकर मत्ते यांच्याकडे उपचाराकरिता नेले होते. त्यानंतर काही वेळातच आकाश पेंदोर याचा मृत्यू झाला.

डॉ. मत्ते यांच्या चुकीच्या उपचारानेच त्याचा मृत्यू झाल्याचा संशय घेऊन डॉ. मत्ते यांना मारहाण करून त्यांच्या दवाखान्याची त्यावेळी तोडफोड करण्यात आली होती. आकाशचे वडील हनुमान चिंदुजी पेंदोर यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूला डॉ. मत्तेच जबाबदार असल्याची तक्रारही पोलिस स्टेशनला नोंदविली होती. तीच खद मनात ठेऊन अमर हनुमान पेंदोर याने हा जीवघेणा हल्ला केल्याचे बोलल्या जात आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात सपोनि संदिप एकाडे, सपोनि माया चाटसे, सपोनि गोपाल जाधव करीत आहे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!