वणी येथे “सत्या ग्रुप”तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
– इच्छुक युवकवर्गानी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे असे आवाहन केले
वणी (18 .फेब्रू ) :- “सत्या ग्रुप” वणी तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन न.प.शाळा क्र.८ रंगारीपुरा येथे करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये covid-19 कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा दिसून येत आहे.

तरी आपणास एकत्र येऊन सामाजिक कर्तव्ये आपल्याला पार पाडायचे आहे.त्याकरिता वणीतील “सत्या ग्रुप ” तर्फे शहरातील युवकवर्ग एकत्रित येऊन सामाजिक बांधीलकी जोपासत”रक्तदान हेच श्रेष्टदान” म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

तरी कोरोनाच्या Covid-19 पार्श्वभूमी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करीत रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक 19/02/2021 रोजी सकाळी 10:00 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी शहरातील इच्छुक नागरिकांनी व युवकवर्गानी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे.असे आवाहन “सत्या ग्रुप ” ने केला आहे.



