Vidarbh24News

Latest Online Breaking News

सिंदेवाही शहरात विना माक्स लावून फिरणाऱ्या नागरिकावर कारवाई

सिंदेवाही शहरात विना माक्स लावून फिरणाऱ्या नागरिकावर कारवाई

सिंदेवाही – कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क लावणे बंधनकारक आहे. मास्कचा वापर न करणाऱ्यांवर 200 रुपयांचा दंड आकारण्याचेही निर्देश राज्यसरकारने दिले आहेत. टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांचा वावर मर्यादित होता. पण टाळेबंदी संपल्यानंतर गर्दीचे प्रमाण वाढले. ही परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून सुरक्षित अंतर राखण्यासह मास्कच्या वापरासाठी जनजागृती केली जात आहे. असे असले तरी सिंदेवाही मध्ये मास्क न वापरणाऱ्यांचे प्रमाण बरेच वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाने कारवाई आणखी तीव्र केली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर अत्यंत प्रभावी ठरत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी मास्क वापरावा, हा कारवाईमागील उद्देश आहे. ही कारवाई तालुका प्रशासनाकडून सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे, पोलीस स्टेशन सिंदेवाही अधिकारी व कर्मचारी तसेच नगरपंचायत यांच्या कर्मचाऱ्याकडून केलेली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!