लालपुलीया परीसरात अज्ञात वाहनाने अनोळखी यूवकास धडक ,युवक जागीच ठार.
– बुधवारी मध्यरात्री दरम्यानची घटना
वणी :- वणी नजीक असलेल्या लालपुलीया परीसरात कॅपिटल मोटर वर्कशॉप समोर अंदाजे २० ते २५ वर्षे वयाच्या युवकास राञी १२ वाजता दरम्यान एका अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली .यात त्याचा मृत्यू जागीच झाला .त्याचा रंग सावळा असुन त्याने जीन्सपॅन्ट व शर्ट घातला असुन उजव्या हातावर आशिष गोदविले होते . वाहनाने निष्काळजीपणे वाहन चालवित .तो अज्ञात युवक जागीच ठार झाला आहे.
तरी इतर पोलीस स्टेशन मध्ये याविषयी हरवले याची नोद असल्यास या सदर गुन्हा दाखल असल्यास ओळख पटल्यावर लगेच वणी ( जिल्हा यवतमाळ )पोलीस स्टेशन मध्ये भेट द्यावी.

अशी सूचना वणी पोलीसांकडुन केली गेली आहे .माहिती कळताच वणी पोलीस स्टेशनला त्वरित संपर्क करावे :-
07239225078 या प्रकरणाचा तपास अधिकारी सा.पोनि संदिप एकाडे ठाणेदार वैभव जाधव याच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.



