Vidarbh24News

Latest Online Breaking News

जगन्नाथ महाराज भांदेवाडा संस्थानचा वतीने राममंदिर निर्माण निधी समर्पण

 

वणी:- संपुर्ण देशात दि. 15 जानेवारी मकर संक्रांतीपासून श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण व गृहसंपर्क अभियान सुरू झाले आहे. या अभियानात पहिल्या टप्प्यात पावती स्वरूपात मोठया प्रमाणात निधी समर्पण करणाऱ्या रामभक्तांचे समर्पण प्राप्त झाले. वणी आणि परिसरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान विदेही संत जगन्नाथ महाराज संस्थान, भांदेवाडा कडून 16016/- रु चा निधी समर्पित करण्यात आला आहे. 

       भांदेवाडा येथे दि. 2 फेब्रुवारीला सांयकाळीच्या दैनिक आरतीच्या नंतर संपन्न झालेल्या कार्यक्रमात  विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संघटन मंत्री अरुण नेटके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, संस्थेचे विश्वस्त व अभियान समितीचे तालुका प्रमुख वसंतराव धानोरकर, संस्थेचे अध्यक्ष बबनराव धानोरकर , विजय चोरडिया, या अभियानाचे  जिल्हा सहप्रमुख  प्रशांत भालेराव, जिल्हा प्रचारक स्वप्नील राऊत,  दिपक नवले, प्रमोद सप्रे, अनिल झाबक, नितीन वासेकर, सूर्यकांत पायघन उपस्थित होते.     

      

याप्रसंगी अरुण नेटके यांनी श्रीरामजन्मभूमी आंदोलन, इतिहास व अभियानाची विस्तृत माहिती दिली.  अभियानासाठी विस्तारक असलेले तुषार शिवणकर,  कुंवरसिंगजी,  चंद्रोदय,  कन्हैया कलपूरवर, महेशजी यांच्यासह मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी असून प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षमतेनुसार निधी समर्पित करावे असे आवाहन अरुण नेटके यांनी केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!