*महिलांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्रात सुरू होणार फिरता दवाखाना; आरोग्य मंत्र्यांचा मोठा निर्णय!*

महिला सुरक्षा आणि महिलांचे आरोग्य यावर अनेकदा बोलले जाते. महत्त्वाचे निर्णय घ्यायची वेळ आली की, मात्र परिस्थिती वेगळी असते. आता महाराष्ट्रामध्ये आरोग्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याद्वारे महिलांचे आरोग्य जपले जाणार आहे.
नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून लवकरच मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरता दवाखाना सुरु करण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं
*फिरत्या दवाखान्यात असणार ही सोय!*
महिलांना घरातून रुग्णालयात आणणे. विशेषतः गरोदर महिला आहेत, त्यांना त्यांच्या घरी सुरक्षित सोडणे.
या फिरत्या दवाखान्यात टेस्टिंग, लॅब, 81 प्रकारची औषधं, 40 प्रकारच्या टेस्ट, सोनोग्राफी आणि महिलांचे बाळंतपण केले जाऊ शकते.
कोरोना काळामध्ये दवाखान्यात जाणे हे जरा अवघड झाले आहे. गरोदर स्त्रियांना मात्र प्रत्येक वेळी दवाखान्यात जाण्याची गरज भासते. अशा वातावरणामध्ये त्यांच्यासाठी फिरता दवाखाना खरंच वरदान ठरणार आहे!
जाहिरातीसाठी संपर्क – चंद्रहास ईटकलवार प्रतिनिधी विदर्भ 24 न्यूज. 8459174128