महिलेवर अतिप्रसंग करना-या नराधमावर गुन्हा दाखल
महिलेवर अतिप्रसंग करना-या नराधमावर गुन्हा दाखल
सिंदेवाही पोलिस स्टेशन ची कारवाई
सिंदेवाही येथून अवघ्या ४ किलोमीटर असलेल्या गावातील ही घटना आहे. पीड़ित महिला सकाळी आपल्या नित्य नियमाप्रमाने शेन खताच्या खडयावर शेन फेकन्याकरिता गेली होती. आरोपी हा जवळच शौचाला बसला होता. पीडितेचे शेन फेकने झाल्यानंतर तिचे ज्या ठिकाणी बैल बांधले होते त्या ठिकाणी ती साफ सफाई करण्यास गेली असता, सदर आरोपी हां तिच्या मागुन येवून तिचे हात पकडून,खाली जमिनीवर पाडून तोंड दाबुन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. व त्यानंतर आरोपी हा त्या ठिकाणाहून पळुन गेला. पिडीतेच्या सदरील रिपोर्ट वरुण पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे अपराध क्र. ४९/२०२१ भादवि कलम ३५४ अंतर्गत आरोपी वर गुन्हा दखल केला असून, पुढील तपास सिंदेवाही पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक नेरकर करीत आहेत.



