वणी येथे ” या अंधारातून…प्रकाशाकडे ” जमात-ए-इस्लामी हिंद वणी ,महाराष्ट्रच्या वतीने राज्यव्यापी अभियान अंतर्गत कार्यक्रम व पत्रकारांचा सत्कार……
वणी : जमात- ए- इस्लामी हिंद वणीच्या वतीने आस्वाद हॉटेल इथे ” या अंधारातून…….. प्रकाशाकडे ” जमात ए इस्लामी हिन्द महाराष्ट्रच्या वतीने राज्यव्यापी अभियान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इंजि.तौफीक असलम ,राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य जमात -ए -इस्लामी हिन्द प्रमुख वक़्ते प्रा.वाजिद अली खान, सदस्य संदेश विभाग जमात -ए -इस्लामी हिन्द महाराष्ट्र प्रमुख पाहुणे वैभव जाधव पोलिस निरीक्षक,वणी हे उपस्थित होते. प्रमुख भाषणा नंतर पत्रकारांचा कोरोना योद्धा म्हणून त्यांचे सत्कार करण्यात आले .


यात सत्कार मूर्ति जब्बार चीनी, राजू धावंज़ेवार ,अजय कडेवार, संदीप बेसरकर, मो.मुस्ताक , लोनारे तसेच वणी भूषण अजय गोदलावार भारतीय आर्मी जवान अमेरिकेला शांती सैनिक म्हणून कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आले आहेत.


कार्यक्रमाचे संचालन ज़िया अहेमद, प्रास्तविक डॉ सय्यद अतीक, आभर डॉ. अरशद शाह यांनी केले तसेच कार्यक्रमानंतर सर्व प्रतिष्ठित व्यक्तिसाठी व पत्रकारांसाठी वणीतील सुरुची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता सलीम अंसारी , ज़ाकिर भाई , शेख सलीम , सय्यद यूनुस, ज़मीर शेख, शकील शेख, आयफाज भाई यांनी अफाट परिश्रम केले.



