राजूर येथे पहिल्यांदाच समाज जागृतीचा उपक्रम हाती घेत वार्ड क्र.4 च्या महिलांतर्फे हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात साजरा
वणी :- राजूर येथील वार्ड क्रमांक 4 महिलातर्फे मकर संक्रांतीनिमित्त सर्वधर्म समभावाची समाज जागृतीचा उपक्रम म्हणून शुक्रवार दि. 22 ला हळदी-कुंकू व सत्कार समारंभाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुषमा पिसे व उद्घाटक म्हणून नीता निमसटकर तर प्रमुख पाहुणे मंजूषा सिडाम ,वंदना देवतडे ,विद्या पेरकावार ,पल्लवी मस्के ,पायल डवरे,सुचिता पाटील ,चेतना पाटील ,रक्षा वानखेड़े, गावातील नवनिर्वाचित ग्रा पं सदस्य म्हणून निवडून आलेले महिला सर्व वार्ड क्र.1, 2,3,4,व 5 ,6 च्या एकूण 150 -200 महिला सुद्धा उपस्थित होते .

तसेच या कार्यक्रमात नवनिर्वाचित ग्रा .पं सदस्य म्हणून निवडून आलेल्या महिलांच्या जंगी सत्कार करण्यात आला .
सर्वानी आपले मनोगत व्यक्त केले व गावातील समाजसेविका व निर्भिड पत्रकार आशा रामटेके यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत येथे सर्व महिलांना एकत्रित करून समाज जागृतीचा उपक्रम हाती घेत त्यांना जागृत केले.
” कुठेतरी महिलांना एकत्र न येऊ देता पोकडी निर्माण होत आहे, त्यांना आता तरी जागृत करून एकत्र येण्याची गरज आहे .असे आशा ताई यांनी म्हटले आहे”व आज आपल्या समाजात स्त्री विरुद्ध स्त्री अशी स्पर्धा निर्माण झाली आहे .ही भावना कुठेतरी सर्व स्त्री एकत्र येऊन नष्ट करण्याची गरज आहे .अन्यथा समाज विकास होण्या ऐवजी आधी घर नष्ट होण्यास सुरुवातीला उशीर होणार नाही .अश्या परखड़ शब्दात आशा रामटेके यांनी मत व्यक्त केले.

तसेच सर्व नवनिर्वाचित ग्रा .पं सदस्य महिलांना वार्ड क्रमांक 4 सर्व महिलातर्फे हार्दिक शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या . सरतेशेवटी महिलांनी एकमेकींना वान हे भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या व हळदी-कुंकवाचा कार्यक्रम अशाप्रकारे पार पाडण्यात आला.



