Vidarbh24News

Latest Online Breaking News

सम्राट अशोकाची मानवतावादी नीती प्रेरणादायी : प्रा. डॉ.किशोर जोगदंड

सम्राट अशोकाची मानवतावादी नीती प्रेरणादायी : प्रा. डॉ.किशोर जोगदंड
********************

विदर्भ24न्यूज प्रतिनिधी

नांदेड दि. 07 जाने 2021

सम्राट अशोक जगातील सर्वोत्तम शासक होते. त्यांनी मानवतावादी नीती अंमलात आणून लोकांना आपलेसे केले. हिंसेचा त्याग करून शांतीच्या बळावर लोकांची मने जिंकून घेतली. त्यांची मानवतावादी नीती आजच्या समाजाला प्रेरणा देणारी आहे. त्यांचे विचार प्रत्येकाने आचरणात आणावे. असे प्रतिपादन सोलापूर येथील वसुंधरा महाविद्यालयातील प्रा.डॉ.किशोर जोगदंड यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेत केले. पुढे ते म्हणाले की, सम्राट अशोक यांनी सांस्कृतिक स्थित्यंतर घडून आणून जगाला क्रांती, माया व शांतीवादाचा संदेश दिला. तलवारी शिवाय उत्तम प्रकारे राज्य कारभार करता येतो आणि धर्मप्रसार करता येतो याचे उदाहरण घालून दिले. याबरोबरच महापुरुषांचे दाखले देत त्यांनी सम्राट अशोकाच्या मानवतावादी नीतीवर विस्तृत प्रकाशझोत टाकला.

*स्पर्धा परीक्षेस अत्यंत उपयुक्त*
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुरु असलेल्या विविध महापुरुषांच्या जीवनावर आधारित ही व्याख्यानमाला आहे. त्यामुळे ही व्याख्यानमाला महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी आहे. म्हणून त्याचा लाभ स्पर्धा परीक्षेच्या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन व्याख्यानमालेचे प्रसिध्दी प्रमुख प्रा. अरुण आलेवार यांनी केले आहे.
***************
ही फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून ते क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या पुण्यतिथी पर्यंत चालणार असून यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी या व्याख्यानमालेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विठ्ठल भंडारे व कार्यकारी संयोजक प्रा. डॉ. राज ताडेराव यांनी केले आहे. ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. माधव बसवंते, डॉ. सुरेश चौथाईवाले, डॉ. संभाजी बिरांजे, डॉ सारिका भंडारे, सौ छाया बेले, श्री. ज्ञानेश्वर ननुरे, डॉ. मोहन लोंढे, प्रा. अरुण आलेवार, श्री. लक्ष्मन डोके, प्रा. गणपत चिवळीकर, डॉ. प्रज्ञाकुमार गाथाडे, श्री. सागर रंधवे, प्रा. जगदीश राणे, प्रा. मनोज कांबळे परिश्रम घेत आहेत.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!