Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी तालुक्यामधील सर्वांत मोठी राजुर ग्रामपंचायतीचा निकालाकड़े लक्ष

वणी :-  दि .१५ जानेवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होती. ही निवडणूक 6 प्रभागमध्ये झाली असून 17 उमेदवार निवडून द्यायचे होते, यासाठी एकूण 48 उमेदवारांनी राजुर ग्रामपंचायत निवडणुकीत आपले नशीब अजमाविले असून या निवडणुकीमध्ये सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांची कसोटी पणाला लागली होती. अशातच 6 प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १ मध्ये 1345 पैकी 945 मतदारांनी आपला हक्क बजावला. प्रभाग क्रमांक २ मध्ये 1594 पैकी 1029 मतदारांनी आपला हक्क बजावला,तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1428  पैकी 911 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.प्रभाग क्र.4 मधे 1747 पैकी 1038,प्रभाग क्र.5 मधे 1090 पैकी 591,प्रभाग क्र.6 मधे 1105 पैकी 468 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

यामध्ये प्रभाग क्रमांक 2 आणि 4  च्या मतदान केंद्रावर सकाळ पासून मतदारांची गर्दी होती. मतदानाची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत चालली मात्र अश्याही स्थितीत या तिन्ही प्रभागामध्ये निम्यावरच मतदान झाल्याचे दिसून आले, यात संपूर्ण मतदानाची आकडेवारी 59.68 टक्के आहे. सहाही प्रभागामध्ये अतिशय चुरस पूर्ण झालेल्या या दोन्ही पॅनल प्रमुखांनी आपलेच उमेदवार निवडून येतील याचे गणित बांधले आहे, सर्वाधिक चुरस प्रभाग क्रमांक 2 व प्रभाग क्रमांक 4 मध्ये बघायला मिळाली.त्यात वर्चस्वची लढाई दिसून आली . “किसमे कितना है दम “हीच स्थिति दिसून आली.

यादरम्यान कोणत्या पॅनलचे किती उमेदवार निवडून येतील, सरपंचाचे आरक्षण काय निघेल, कोण सरपंच होईल यासाठी नागरिकांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. या निवडणुकीमध्ये जिंकून येण्यासाठी मतदान केले.राजुर केंद्रावर वणी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. ह्यावेळी मतदान सुरळीत पार पडले. आता येत्या १८ तारखेला होणाऱ्या निकालाकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!