Vidarbh24News

Latest Online Breaking News

मानकी येथे बालिकेचा विनयभंग, आरोपीस तात्काळ अटक

 

वणी ( 15. जाने ) :- वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा मानकी येथे एका अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
प्रकाश अशोक चौधरी (36)रा. मानकी असे आरोपीचे नाव आहे. आज दि.15 जानेवारीला तालुक्यात ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरु आहेत. त्याच प्रमाणे मानकी गावात सुद्धा मतदान सुरु आहे. सद्या बाहेर गावी असलेल्या मतदारांना,उमेदवारांकडून मतदानाकरिता गावात आणले जात आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा असलेला आरोपी प्रकाश चौधरी हा सुद्धा बाहेर गावी रहात होता त्याला आज शुक्रवारी मतदान करण्यासाठी गावात आणले होते.

दरम्यान गावातील एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून तू खूप सुंदर आहे, असे म्हणून तिचा विनयभंग केला. या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच डी.बी.पथक घटनास्थळी ताबडतोब दाखल होऊन आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले.

अत्याचार ग्रस्त मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 354 भादंवि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सपोनि/ मायाताई चाटसे करीत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!