Vidarbh24News

Latest Online Breaking News

गत 24 तासात 22 कोरोनामुक्त ; 22 नव्याने पॉझिटिव्ह  आतापर्यंत 1,87,968 नमुन्यांची तपासणी  आतापर्यंत 22,080 जणांची कोरोनावर मात

 आतापर्यंत 1,87,968 नमुन्यांची तपासणी

 आतापर्यंत 22,080 जणांची कोरोनावर मात

चंद्रपूर, दि. 14 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर तितक्याच 22 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 778 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 80 झाली आहे. सध्या 318 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 87 हजार 968 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 63 हजार 335 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत 380 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 345, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 12, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 22 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील सात, चंद्रपूर तालुक्यात दोन, भद्रावती चार, नागभिड एक, राजुरा एक, चिमुर दोन, वरोरा दोन, कोरपना दोन व इतर ठिकाणचे एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!