*आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर मिळणार नाही कोरोना लस!*
येत्या शनिवारी देशात सुरु होत असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत आधार कार्ड च तुमचा आधार ठरणार आहे. इतर महत्त्वाच्या गोष्टींप्रमाणेच कोरोनाविरूद्धच्या या मोठ्या लढ्यातही आधार कार्ड एक मोठी भूमिका बजावणार आहे.
जर, आपण आपले आधार कार्ड मोबाईल फोन नंबरशी लिंक केलेले नसेल, तर सर्वात आधी हे महत्त्वाचे काम उरकून घ्या. कारण या लसीची सर्व माहिती आधार क्रमांकाशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर पाठवण्यात येणार आहे.
वास्तविक वेळेत लसीकरणाचा डेटा मिळण्यावर सरकारने बराच जोर दिला आहे. जे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड सादर करतील, त्यांना त्वरित एक अनोखा आरोग्य आयडी दिला जाईल. एकदा यूएचआयडी तयार झाल्यावर त्या व्यक्तीच्या आरोग्याची नोंद ऑनलाईन प्रक्रियेद्वारे होईल.
सर्व प्रथम नोंदणी करावी लागेल. लस नोंदणी व लसीकरणाच्या वेळी फोटो असणारे ओळखपत्र आवश्यक असेल. नोंदणीनंतरच एसएमएसद्वारे स्थान व वेळ याची माहिती मिळेल. नोंदणीनंतरच ही लस त्या व्यक्तीस देण्यात येईल.
प्रत्येक व्यक्तीस 28 दिवसांच्या अंतरात दोनदा लस दिली जाईल. ज्याचा वेळ व ठिकाणही नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे मिळेल. लसीकरणानंतर लाभार्थ्यास त्याच्या मोबाईल नंबरवर क्यूआर कोड आधारित प्रमाणपत्रही पाठवले जाईल.
📍 *नोंदणी आणि ओळखपत्र*
नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी, आपल्याला फोटो असणारे ओळखपत्र दाखवावे लागेल. यासाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, पासपोर्ट, जॉब कार्ड, पेन्शन रेकॉर्ड, मनरेगा कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे जारी केलेले सर्व्हिस कार्ड या पैकी एक ओळखपत्र सादर करावे लागेल.



