फ्री मेथोडिस्ट चर्च वणी व राजुर येथे नाताळ (ख्रिसमस) सण साजरा

वणी :- वणी व राजुर येथील फ्री मेथोडिस्ट चर्चच्या वतीने दरवर्षी प्रमाणे सण साजरा न करता शासनाच्या दिलेल्या अटी व सूचनेप्रमाणे आदेशाचे पालन करीत नाताळाचा सण मोजक्या लोकांच्या उपस्थितीत व शांततेत पार पाडण्यात आला.
युवक, बालक, महिला व वृद्ध प्रभू येशू वर आधारित गीत गायले, नृत्य करण्यात आले व वचने वाचण्यात आली.
चर्चमधील प्रत्येकाने देशात चाललेल्या परिस्थितीसाठी तसेच वाढलेला कोरोना कमी होण्याकरिता प्रार्थना करण्यात आले.
तसेच प्रभू येशूच्या जन्मदिनानिमित्त बालकांतर्फे केक कापून देशातील प्रत्येक समाज बांधवांसाठी मनःपूर्वक प्रार्थना करण्यात आल्या.
येशुची शिकवण “प्रीती”हेच मुख्य उद्देश्य म्हणून सर्व देश बांधव हे एकच । हाच महत्वपूर्ण व्याख्यान प्रबोधन चर्चमधे करण्यात आले.
वणी व राजुरचा पास्टरांद्वारे प्रभू येशूच्या जीवनाचे प्रसंग व सुसमाचार सांगण्यात आले .त्यावेळी उपस्थित म्हणून सर्व ख्रिस्तीसमाज बांधव व कमिटीचे सर्व सभासद होते.



