पोलीस बॉईज असोसिएशन पालघर जिल्हाध्यक्ष पदी प्रणय जाधव यांची नवीन निवड -तर जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रताप दुपारे यांची निवड
पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केले जाहीर
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी
पालघर :- २८डिसेंबर २०२० रोजी पालघर येथील रहिवासी असलेले प्रणय दीपक जाधव यांची पोलीस बॉईज असोसिएशनच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदी नवीन नियुक्ती झाल्याचे तसेच पालघर जिल्हा उपाध्यक्ष पदी प्रताप महादेव दुपारे यांची निवड झाल्याचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे,
पालघर जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष स्व.हितेश भाई भट यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते त्यामुळे भट साहेबांचे अत्यंत विश्वासू असलेले प्रणय जाधव यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, प्रणय जाधव हे सन २०१६ पासून पोलीस बॉईज असोसिएशनचे वसई शहर अध्यक्ष म्हणून काम बघत होते,
मुंबई येथील झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला , पोलीस बॉईज असोसिएशनचे महाराष्ट्र उपाध्यक्ष शैलेश पांडव , मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सय्यदराजा मुजावर तसेच मुंबई संघटक संजय डे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. 



