Vidarbh24News

Latest Online Breaking News

गत 24 तासात 77 कोरोनामुक्त 44 नव्याने पॉझिटिव्ह Ø आतापर्यंत 21,269 बाधित झाले बरे Ø उपचार घेत असलेले बाधित 551

Ø आतापर्यंत 21,269 बाधित झाले बरे

Ø उपचार घेत असलेले बाधित 551

चंद्रपूर, दि. 27 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 77 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 44 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 22 हजार 179 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 21 हजार 269 झाली आहे. सध्या 551 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 69 हजार 945 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 44 हजार 831 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 359 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 332, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 16, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 44 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 17, चंद्रपूर तालुक्यातील तीन, बल्लारपुर एक, भद्रावती चार, नागभीड तीन, सिंदेवाही एक, राजूरा एक, चिमुर सहा, वरोरा चार, कोरपना तीन व इतर ठिकाणच्या एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना अजून गेलेला नाही त्यामुळे नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!