“ओबीसी जातनिहाय जनगणना व्हावी “या मागणीला सुतार समाज वणीचा पाठिंबा
3 जानेवारीच्या ” ओबीसी विशाल ” मोर्चात होणार सहभागी
वणी(27.डिसें ) :- ३ जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीच्या चे अवचित्त साधून ओबीसी जातनिहाय जनगणना व्हावी ही प्रमुख मागणी घेऊन ओबीसी चा वणीत विशाल मोर्चा आयोजित केला आहे.दिनांक २६ डिसेंबर महादेव मंदिर,सुतार पुरा,येते सुतार समाजाची बैढक घेण्यात आली.यात सुतार समाजच्या वतीने ओबीसी च्या मागणीला पाठिंबा देत मोठ्या संख्येने सहभागी राहू असे सांगण्यात आले.
ओबीसी जातनिहाय जनगणना व्हावी या अनुषंगाने ओबीसीचा विशाल मोर्चा आयोजित केला आहे.भारतीय राज्यघटनेत ओबीसींच्या ३४० कलमाप्रमाणे आपल्या समुहाच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण जातीची जनगणना होणे गरजेचे आहे. ही मागणी केंद्रसरकारणे मंजूर करून ओबीसी प्रश्न सोडवावे ह्या साठी बारा बलुतेदार महासंघाचे वणी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रविणभाऊ खानझोडे, राजू तुरणकर प्रा.मुळे यांच्या मार्गदर्शनात वणी तालुक्यातील सर्व सुतार समाज बांधवांनी होणाऱ्या ओबीसींचा विशाल मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन बैठकीत सहभागी होण्याची घोषणा करण्यात आली.यावेळी मयात्मज विश्वकर्मामय झाडे सुतार समाज संस्था, वणी अध्यक्ष अमन बुरडकर,युवा मंच अध्यक्ष महेश राखुंडे,महिला मंच अध्यक्षा रत्नताई अड्रस्कर, नगरसेविका आरती वांढरे,किसनराव दुधलकर,दौलतराव झिलपे,अशोकराव बुरडकर,रमेश बुरडकर, संजय वनकर,विजय जयपूरकर, गोविंदा निवलकर, प्रशांत झिलपे,शैलेश झिलपे,राजेंद्र मुरस्कर, माधवराव द्रुगकर, बाळू गहुकर, शालीकराव दुधलकर,अरुण घोंगे,रितिक झिलपे,रितेश साखरकर, कल्पक अड्रस्कर,रूपक अड्रस्कर, अक्षय झिलपे,प्रासाद झिलपे,निखिल झिलपे,पूनम झिलपे,लता झिलपे,आदी समाज कार्यकारणी पदाधिकारी, युवा मंच व महिला मंच सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम नवघरे यांनी केले.



