वणी येथिल शिवसेना कार्यकर्ते धावले रंगारीपुऱ्यात जळालेल्या वृद्ध महिलेसाठी…..
वणी :- आज दिनांक 24.12.2020 सकाळी ९ च्यादरम्यान वणी येथिल रंगारीपुऱ्यात वृद्ध महिला जळाली. त्या महिलेेचे नाव सुभद्रा वाघ वय 65वर्ष हया चूल पेटविण्यासाठी गेल्या असता, त्यात रॉकेलं सांडल्याने जळल्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांना कळताच धावपळ केली.
त्यावेळी शिवसेनेचे राजू तुराणकर व युवा सेनाअजिंक्य शेंडे यांना कळताच तेथे पोहचून त्यांनी शेजाऱ्यांच्या सहकार्याने सुभद्रा वाघ यांना उचलून तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले प्रथमोपचार करून डॉ. सुलभेवर यांनी ९० टक्के जळल्याने त्यांना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
सुभद्रा वाघ हया रंगारीपुऱ्यात राहत होत्या.तिन्ही मुले नौकरीवर नागपूर येथे राहतात व दोन्ही मुली नागपूर येथेच संसार करीत आहे.
.
दोन वर्षांपूर्वी पती रामभाऊ वाघ यांचे निधनानंतर त्या एकाकी जीवन जगत आहेत .तसेच वृद्धापकाळाने शारीरिक होणारा त्रास यामुळे त्या नेहमीच परेशानी असायचे अशी चर्चा आहे.



