Vidarbh24News

Latest Online Breaking News

सध्या राजुर गावातील ग्रामपंचातीसाठी आजी – माजी बड़े नेते ,उमेदवार व नवख्या उमेदवारांची कसरत सुरु…….

 

वणी :- जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायतील निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून काल दिनांक 23 डिसेंबर पासून निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात होत आहे. राजुर येथील ग्रामपंचायत ही वणी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध आहे तसेच हा गाव मिनी इंडिया म्हणून सुद्धा गाजलेला आहे . कारण येथे बहुजातिचे व परप्रांतीय लोक वसलेले आहे.

त्यामुळे इथे आजी-माजी नेते, सरपंच , सभासदाची व  संभाव्य उमेदवारांचे खऱ्या अर्थाने कसरत चालू झाली आहे .जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली असून,23 ते 30 डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल होणार आहे व 31 डिसेंबर नामनिर्देशनाचे छानणी होणार आहे. 4 जानेवारीपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत दिलेली आहे. 4 जानेवारी दुपारी 3 च्या नंतर संभाव्य उमेदवारांची नावे व चिन्ह वाटप करण्यात येणार आहे .15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे व 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.त्यामुळे संभाव्य उमेदवार आता कामाला लागले असून निवडणूक यंत्रणा सुद्धा सज्ज झाले आहेत व वणी तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेले आहेत.

ऑनलाईन अर्ज भरून त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व घोषणापत्र उमेदवारांनी उमेदवाराचे ऑफलाईन द्वारे संबंधित अधिकार्‍यांकडे आणून देण्याची सूचना व शिक्षणाबाबत गोंधळ निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्याला अट  घातली आहे .

मात्र सरपंचाची सोडत झालेली नाही. आता राजुर येथे संपूर्ण पैनलवर खर्च कोण करणार ? आणि सर्वस्वी जबाबदारी ही कुणाची राहणार ?

प्रत्येक गावाची परिस्थिति सध्या बिकट अवस्थेत असल्याने कोणता उमेदवार निवडून आणायचे हेच कुणाला ठाऊक नाही ?

सध्या राजुर गावातील नेते ,आजी – माजी व संभाव्य उमेदवाराची गावात खुप कसरत करतांना दिसुन येत आहे.विकास क़ाय झाला व किती झाला यापेक्षा आपले वर्चस्व कसे गाजवता येईल  ! याकडे जोर लागलेला दिसून येत आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!