सिंदेवाही तहसीलदार यांनी रेतीचोरांच्या मुसक्या आवळल्या

सिंदेवाही तहसीलदार यांनी रेतीचोरांच्या मुसक्या आवळल्या
सिंदेवाही तालुक्याती रेती तस्कर रेती तस्करीत निपून असल्याने महसूल विभागाला त्याने बरेचदा हुलकावणी दिली. परंतू दिनांक १७/१२/२०२० ला महसूल विभागाला मिळालेल्या गोपनिय सुचणेवरून, सिंदेवाहिच्या तहसिलदार सुश्री. पर्वणी पाटील यांचे आदेशावरून,
सिंदेवाहीचे राजस्व निरीक्षक चिडे व तलाठी पंचभाई यांनी सुचविलेल्या ठीकाणावर जाऊन पाहीले असता,
सिंदेवाही तालुक्यातील वाकल रेतीघाटावरून रेतीचे उत्खणन करून, वाहनचालक तुळशीदास मानकर वय ५० वर्षे रा. सिंदेवाही हा ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्याने रेती भरून जात असलेल्या ट्रॅक्टरला थांबवून,वाहन चालकाला ट्रॅक्टर मालकाचे नांव विचारले असता, सदर ट्रॅक्टर हा संजय बुधाजी लोखंडे, रा. मदनापूर वार्ड, सिंदेवाही याचे मालकीचा असल्याचे वाहन चालकाने सांगितले. सदरचा ट्रॅक्टर रात्री ११-१५ वाजता रेतीची अवैध वाहतूक करीत होता. तेव्हा त्याला थांबवून चौकशी केली असता ट्रॅक्टरमध्ये रेती भरलेली असल्याचे आढळल्याने राजस्व निरीक्षक चिडे आणि तलाठी पंचभाई यांनी जागेवरच ट्रॅक्टरचा पंचनामामा करूण, स्वराज कंपणीचा MH 34 – BG 1520 ह्या नंबर चा ट्रॅक्टरचा जप्तीनामा करूण, ट्रॅक्टर आपले ताब्यात घेतला व सहकाऱ्यांचे मदतीने ट्रॅक्टर तहसिल कार्यालयाचे आवारात जमा केला. व त्याचा जप्ती पंचनामा अहवाल तहसिलदार सिंदेवाही यांना सादर केला असल्याचे राजस्व निरीक्षक चिडे यांनी सांगीतले. पुढील कारवाई काय झाली याबाबत माहिती नसल्याचे ते बोलले.