Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोलिस प्रशासनाच्या कार्यवाहीत, सुगंधीत तंबाखू व गुटखा जप्त

सुमारे 70 हजारांचा माल जप्त, तर दोघांना अटक ..

वणी (19 डिसें) :- वणी पोलिसांनी शहरातील पान टपरीवर कार्यवाही करुन, सुगंधित तंबाखू व गुटख्याच्या साठा जप्त केला. जप्त केलेल्या मालाची किंमत 71,500 रुपये असून या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. संध्याकाळच्या सुमारास वणी पोलीस आणि अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) यांनी संयुक्तरित्या ही कार्यवाही केली.
या कार्यवाहीत पोलिसांनी प्रतिबंधित (मजा 108) तंबाखूचे 200 ग्रॅम व 50 ग्रॅम तंबाखूचे डब्बे ज्याची किंमत 65139 रु. पान पराग गुटखा 12 डब्बे किंमत 3600 रु. व अन्नी गोल्ड स्वीट सुपारी 46 पॅकेट ज्याची किंमत 2740 रुपये असा एकूण 71499 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पान सेंटर चालक मृणाल नवनाथ वेलेकर (33 वर्ष) रा. फाले ले आऊट वणी यास अटक करण्यात आली. पान सेंटर चालकाची चौकशी केली असता त्याने सदर माल घुग्गुस, जि. चंद्रपूर येथील नीरज रमेशचंद्र गुप्ता यांच्या कडून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी नीरज रमेशचंद्र गुप्ता (28 वर्ष) याला देखील अटक केली.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपी विरुद्द कलम 26(2), 27, 30(2)(अ), 23, 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 च्या सहकलम 188, 273, 272, 269, 270 भा.दं.वि. अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला

.
सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात पो. नि. वैभव जाधव, डीबी पथकाचे पोऊपनि गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, सुदर्शन वानोले, पंकज उंबरकर, अमित पोयाम, रत्नपाल मोहाडे, दीपक वांड्रसवार यांनी केली.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!