राजुर काॅलरी येथे वे.को.ली कामगार मारहाणीत जखमी
वणी (18 डिसें ):- वणी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या राजुर काॅलरी मध्ये एका वे.को.ली कामगारास मारहाण करून जखमी केल्याची घटना गुरुवारी दि.१७ डिसेम्बर रोजी उघडकीस आली असून, एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, निलजई कोळसा खाणीत काम करणारे रविशंकर रामचंद्र गौर (३७)रा. राजुर काॅलरी यांचा त्याचे घरा शेजारील राजु सुरज कोठारे (३७)रा.साई नगरी (राजुर काॅ )यांच्या बरोबर एक महिन्या पुर्वी वाद झाला होता. ते प्रकरण तेव्हा पोलीसांत गेल़े होते.
दरम्यान आज रविशंकर गौर हे साईनगरी येथील सासुरवाडीत आले असताना त्याला पाहुन राजु कोठारे हा शिवीगाळ करू लागला व एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रागाच्या भरात घरून लोखंडी धारदार पट्टीने पोटावर, छातीजवळ मारून जख्मी केले.
जीवाने मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वणी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोदवीली. या तक्रारीवरून राजू सुरज कोठारे विरुद्ध भादवी ३२४, ५०४,५०६ कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा तपास जमादार डोमाजी भादीकर करीत आहेत.



