Vidarbh24News

Latest Online Breaking News

अखेर……नरभक्षक बिबट्याचा खेळ खल्लास

– धवलसिंह मोहिते पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा वेध

विदर्भ 24न्यूज

जिल्हा प्रतिनिधी/
सोलापूर : करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभाला अखेर यश आलं आहे. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला. वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती.
अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.
करमाळा तालुक्यात सात डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजता याच ठिकाणी एक 9 वर्षांच्या ऊसतोड मजुरांच्या मुलीवर हल्ला केला होता. मुलीचा आवाज ऐकताच इतर ग्रामस्थ काठ्या घेऊन आल्यावर त्याने मुलीला सोडून शेजारील उसात पळ काढला होता. यानंतर मोठ्या संख्येने वन विभाग व पोलिसांचा सशस्त्र फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि सुरू झाले मिशन बिबट्या.
या ऊस फडाशेजारी वागर (जाळं) लावून वन विभागाचे गन मॅन, शार्प शूटर व पोलीस अधिकारी उसात जाऊन तपास करीत होते. त्यामुळे बिबट्याने मोर्चा शेजारील केळीच्या बागेत वळवला. येथे शार्प शूटरने फायर केले. मात्र, ते चुकवत बिबट्याने परत उसात धूम ठोकली. यानंतर वन अधिकाऱ्यांनी सर्व ऊस चारी बाजूने पेटवताच बिबट्या एका बाजूने दुसऱ्या केळीच्या बागेत निसटल्याने हे मिशन फेल झाले. या सर्व नाट्यमय घडामोडी घडत असताना करमाळा आमदार संजय शिंदे हे आपले पिस्तूल घेऊन ग्रामस्थांच्या सोबत थांबले होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!