तालुकास्तरीय पुरस्कार विध्यार्थी वितरण सोहळा
“”तालुकास्तरीय पुरस्कार विध्यार्थी वितरण सोहळा ”
____________________
सिंदेवाही – बामसेफ ,बहुजन विध्यार्थी संघटना व बहुजन समाज पार्टी तालुका सिंदेवाहीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय विध्यार्थी पुरस्कार वितरण कार्यक्रम सिंदेवाही नगर पत्रकार संघ कार्यालय सिंदेवाही येथे नुकताच सम्पन्न झाला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बामसेफचे प्रा .भारत मेश्राम होते .प्रमुख अतिथी नगरसेवक प्रा .युनूस शेख ,नगर पत्रकार संघाचे विलास धुळेवार ,बहुजन समाज पार्टीचे नंदु खोब्रागडे व युवा सामाजिक ब्रिगेडचे अमोल निनावे उपस्थित होते .
याप्रसंगी अतीथीण्चे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले .त्यानंतर अतीथीनी विध्यार्थीना मार्गदर्शन केले .
दरम्यान ,सिंदेवाही तालुक्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या विध्यार्थीसाठी आयोजित करण्यात आलेल्या निबंध ,चित्रकला ,प्रष्ण्मण्जुषा व संविधान परीक्षेतील तालुक्यातून प्रथम ,द्वितीय व त्रूतिय पुरस्कार विजेत्या विध्यार्थीचा अतीथीण्च्या हस्ते बक्षिस व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
यामधे तालुकास्तरीय संविधान परिक्षेत अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व त्रुत्रीय विजेत्या भारत विद्यालय नवरगावचा विध्यार्थी संघर्ष चंद्रप्रकाश चहान्दे ,प्राजक्ता विद्यामंदिर सिंदेवाहीचा तेजस भूपेश पिसे व महात्मा फूले विद्यालय सिंदेवाहीची विध्यार्थीनी वणश्री प्रभु रन्दये यांना भारताचे संविधान पूस्तक देऊन गौरविण्यात आले .
तालुकास्तरीय निबंध स्पर्धेतील अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व त्रूतिय विजेत्या सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाहीची विध्यार्थीनी सरोज संतोष लोखंडे ,सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाहीची केजुषा संतोष लोखंडे व सिताबाई शेंडे विद्यालय सिंदेवाहीची रूचिता प्रमोद भेण्डाले यांचा निबंध पूस्तक आणि पेन व डायरी देऊन सत्कार करण्यात आला .तालुकास्तरीय प्रष्मण्जुषा स्पर्धेत अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व त्रूतिय विजेते महात्मा फूले विद्यालय सिंदेवाहीचा हिमांशू प्रभु रन्दये ,प्राजक्ता विद्यामंदिर सिंदेवाहीची दिशा बारिकराव खोब्रागडे व विश्वज्योति स्कुलची समता भारत मेश्राम यांना डिक्शनरी व सामान्य ज्ञान पूस्तक देऊन गौरविण्यात आली .
तर तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत विश्वज्योति स्कुलची अवनि भारत मेश्राम ,देवयानी स्कुल सिंदेवाहीची तनिष्का सुरेश खोब्रागडे व यशराज इंग्लिश स्कुलचा वाजीद वहाब अली अनुक्रमे प्रथम ,द्वितीय व त्रूतिय विजेत्याचा चित्रकला पुस्तिका व कलर संच देऊन सत्कार करण्यात आला .
शेवटी सर्व विजेत्या विध्यार्थीनां अल्पोपहार व केळी वितरण करण्यात आलीत .कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षणतज्ञ प्रा .भारत मेश्राम यानी केले .संचालन विध्यार्थी संघर्ष चहान्दे तर शिक्षक बारिकराव खोब्रागडे यानी आभार मानले .या कार्यक्रमातील विजेत्या विध्यार्थीनां पुरस्कारकरीता बामसेफ चंद्रपूरचे इंजि.बाळू रत्नपारखी , डा .विनय बण्डावार ,केन्द्र प्रमूख मंदा उमरे,प्रा .युनूस शेख ,अमोल निनावे व मिथुन शेंडे यानी आर्थीक सहकार्य केले .
________________________________________