Vidarbh24News

Latest Online Breaking News

अनैतिक संबंध बेतले जीवावर, प्रियकरानेच केला गेम……

 

वणी पोलीसांनी अवघ्या एका दिवसातच लावला आरोपीचा छड़ा…..वणीत पोलिसांच्या कामाची जोरदार चर्चा…..….

वणी (12.डिसें) :- काल शुक्रवारी दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी वणीतील नांदेपेरा रोडवर वांजरी शेत शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता.  वणी पोलीस कर्तव्यदक्ष ठाणेदार वैभव जाधव व  यांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवित खुनातील आरोपीला अवघ्या  एका दिवसात छड़ा लावला आणि सदर महिलेचा खून हा अनैतिक संबंधाने झाल्याचे स्पष्ट झाले सदर महिलेला आरोपीने आधी लोखंडी रॉडने व नंतर दगड़ाने ठेचुन निर्घृण हत्या केल्याची कबूली आरोपीसंजय शामराव सालवटकर वय ४२ वर्ष रा.साखरा(राजापुर) ता वरोरा जि. चंद्रपुर हयांना दिनांक ११ डिसेंबर २०२० रोजी गुन्हयात अटक केली.

दरम्यान दिनाक ११ डिसेंबर २०२० रोजी पो.स्टे.वणी येथे फिर्यादी भगवान मोतीराम मत्ते (६५) रा. पिंपळगांव ता.वणी, जि. यवतमाळ यानी रिपोर्ट दिला की, त्यांची मुलगी नामे सौ.जया मनोज आवारी (३२) रा. पटवारी कॉलनी वणी हीचा वांजरी शिवार रोडवर खुन झाला,असुन सशयत म्हणून प्रफल मारोती नवले (२४)रा. वाघदरा ता.वणी हयाने केला असा संशय असल्याचा रिपोर्ट वरून पो.स्टे वणी येथे अप क्र. २८०/२० कलम ३०२ भा.दं.वि चा गुन्हा नोंद करून तपासावर घेण्यात आला. सदर गुन्हयातील संशयीत व्यक्तीला चौकशी करीता ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने गुन्हा केला नसल्याचे सांगितल्याने यांचा गुन्हयात सहभाग नसल्याचे दिसुन आले.

तांत्रिक व पारपारीक पध्दतीने तपास करुन मृतक जया आवारी हीचे नेहमी संपर्कात राहणारा इसम हयास चौकशी करीता ताब्यात घेतले. व त्याची कसुन चौकशी केली असता त्याने जया आवारी हीचे सोबत मागिल 10  वर्षापासून ओळख असुन तीचे सोबत प्रेमसबंध होते व तीचे सोबत नेहमी भेटत असायचे.

दरम्यान दिनांक १० डिसेंबर २०२० रोजी नेहमी सारखे भेटण्या करीता आलो व तीला वरोरा रोड येथुन टाटा सुमो वाहनात बसवुन नादेपेरा रोड, वाजरी येथील शेत शिवारातील बंडया जवळ नेले व तेथे बोलत असताना तीने मला पैशाची मागणी केल्याने तीचे सोबत वाद झाला व त्यातुन तीचे डोक्यावर लोखंडी रॉड आणि दगडाने मारून तीचा खुन केला असे सांगितले.

आरोपी संजय शामराव सालवटकर वय ४२ वर्ष रा.साखरा(राजापुर) ता वरोरा जि. चंद्रपुर हयांना दिनांक ११ डिसेंबर २०२० रोजी गुन्हयात अटक केली. गुन्हयाचे तपासात आरोपी संजय शामराव सालवटकर (४२)रा. साखरा (राजापुर) ता.वरोरा जि. चंद्रपुर हयाने गुन्हयात वापरलेली टाटा सुमो वाहन क्र.एम .एच ३४ ए.व्ही- ९५२४ ही जप्त करण्यात आली. तसेच जया आवारी हिचे डोक्यावर मारणे करीता वापरलेला लोखंडी रॉड जप्त करण्यात आला तसेच आरोपीने जया आवारी हिचा खुन केल्यानंतर ती वापरत असलेला मोबाईल हॅन्डसेट घेवून त्याचे गांवाला शेतात लपवुन ठेवल्याने तो सुध्दा गुन्हयाचे तपासात जप्त केला आहे. सदर आरोपीस पि.सी.आर करीता मा.न्यायादंडाधिकारी सा.वणी येथे पेश करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.नि.वैभव जाधव व तपास पथक करत आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!