चिचाळा येथील स्मशानभूमीच्या बांधकामातील भ्रष्टाचाराचा तीढा कायम

संबंधित अधिकाऱ्यांचे भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/मुल:-मौजा चिंचाळा तालुका मुल येथील स्मशानभूमीच्या भ्रष्टाचाराला घेऊन उलगुलान संघटनेने मागील आठवड्यात प्रशासनाला निवेदन दिले होते. उलगुलान संघटनेने पुराव्यानिशी भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणले व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. स्मशानभूमीच्या बांधकामात अनियमितता असून प्रशासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात निकृष्ट बांधकाम करण्यात आले आहे. याबाबतची तक्रार उलगुलान संघटनेने जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग मुल उपविभागीय अभियंता जवळ केली.
उपविभागीय अभियंता मुल गोंगले, व त्यांचे सहकारी ठाकरे यांनी संबंधित स्मशानभूमीची चौकशी केली.
थातूरमातूर चौकशी करून संबंधित अधिकाऱी ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. उलगुलान संघटनेचे शाखा अध्यक्ष निखील वाढई, उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन वरील अधिकाऱ्यांना यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे हे दाखविले व कारवाई करण्याची मागणी केली. तरीसुद्धा अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई न करता उलगुलान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांजवळ ही गोष्ट दाबुन द्या असे बोलू लागले.
संघटनेचे पदाधिकारी आक्रमक होताच कोणतीही कारवाई न करता अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. यावरून अधिकारी व ठेकेदार यांच्यामध्ये साटेलोटे असल्याचा प्रकार दिसून येत आहे असा आरोप उलगुलान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी होऊन दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उलगुलान संघटनेचे शाखाअध्यक्ष निखिल वाढई व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343