Vidarbh24News

Latest Online Breaking News

मुल येथील वार्ड क्रमांक १२ येथे रस्त्याचे निकृष्ट बांधकाम

-उलगुलान संघटनेने निकृष्ट बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/
मुल:- नगरपरिषदे अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक १२ सावरकर वार्ड मध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. नागोसे यांच्या घरापासून ठेव नखाते यांच्या घरापर्यंत रोडचे बांधकाम सुरू असून त्याठिकाणी रस्त्याचे बांधकाम निकृष्ट होत आहे असे तेथील नागरिकांनी उलगुलान संघटनेला सांगितले.

तात्काळ उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित रस्त्याच्या बांधकामाची पाहणी केली असता त्याठिकाणी दबाई बरोबर झालेली नसल्याचे आढळले.GSB सहा इंच दबाई करण्याचा नियम असताना त्या ठिकाणी चारच इंच दबाई करण्यात आली होती. रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट होतानाचे आढळून आले. संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझरला विचारणा केली असताना उद्धटपणे उत्तरे दिली. याठिकाणी जनतेची व प्रशासनाची दिशाभूल करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे तरी या भ्रष्टाचाराची चौकशी तात्काळ करण्यात यावी करिता उलगुलान संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मुल यांना निवेदन दिले.


जर संबंधित रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून तात्काळ संबंधित ठेकेदारावर कारवाई केली नाही तर उलगुलान संघटना तीव्र आंदोलन करणार असा इशारा संघटनेद्वारे देण्यात आला. निवेदन देताना उलगुलान संघटनेचे शाखा अध्यक्ष निखिल वाढई उपाध्यक्ष प्रणित पाल, आकाश येसनकर, सुजित खोब्रागडे, रोहित शेंडे, अक्षय दुमावार, वतन चिकाटे तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!