अवैध रेती वाहतूक करणा-या दोन ट्रॅक्टरसह ,दोन इसमास अटक .
वणी :- चिखलग़ाव येथे दोन ट्रैक्टर व दोन चालकसह एकूण 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . अवैद्य रेती तस्करी करणाऱ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत एक प्रशंसनिय कार्य केले .रेती घाटातून अवैध्य रित्या रेती उत्खनन करून चोरून रेती वाहतूक होणार आहे, अशा महितीनुसार वचिखलगाव परिसरात जाऊन पाहणी केली असता, १) ट्रॅक्टर मुंडी क्र. एम.एच. २९ बी.सी.९८८४ चे ट्रॉली मध्ये १ ब्रॉसरेती कि. ५०००/- २) ट्रॅक्टर मुंडी क्र. एम.एच. २९ ए.के १५६३ चे ट्रॉली मध्ये १ ब्रॉस रेती कि.५०००/- असे एकूण दोन ब्रॉस रेती कि.अं. १०,००० /- असा एकूण १०,१०,००० /-चा मुद्देमाल सह आरोपी १) गजानन मारोती वसाके, वय ३१ वर्ष रा.चिखलगाव ता.वणी २) संतोष दत्तू आवारी, वय ३४ वर्ष रा. चिखलगाव ता.वणी जी.यवतमाळ यांना गुन्हयात अटक करून दिनांक २१/११/२०२० रोजी पो.स्टे.वणी अप क्र.९५२/२०२० व ९५३/२०२० क.३७९ भा.दं.वि. सह क.१३० (१), ५० (ए ) / १७७ मोवाका चा गुंन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.संजय पुज्जलवार उप.वि. पो. अ. वनीं , यांचे मार्गदर्शनात पो.नि. वैभव जाधव, सपोनि/ संदीप एकाळे पोहवा/ सुदर्शन वानोळे ,इमरान खान, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पोकॉ / पंकज उंबरकर ,यांनी केला.



