पोलीस बॉईज असोसिएशन यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी प्रदीप ( अण्णा ) मेटेकर यांची फेरनिवड
पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केले जाहीर
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी
यवतमाळ:- येथील रहिवासी असलेले सिनियर पोलीस बॉईज प्रदीप ( अण्णा ) नारायणस्वामी मेटेकर यांची पोलीस बॉईज असोसिएशन यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड करण्यात आली असल्याचे पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी कळविले आहे.
प्रदीप ( अण्णा ) मेटेकर हे अखिल भारतीय तेलगू महासंघाचे सचिव असून ते भारतीय जनता युवा मोर्चाचे यवतमाळचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आहेत,त्यांनी सन 2018 – 2019 मध्ये पोलीस बॉईज असोसिएशनचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष पद भूषविले आहे, ते यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे प्रदीप ( अण्णा ) मेटेकर यांची ही उल्लेखनीय कामगिरी पाहता त्यांची यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी फेरनिवड केली आहे, त्यांच्या या निवडीबद्दल यवतमाळ जिल्ह्यातून सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांना विदर्भ अध्यक्ष शाहेद सय्यद व विदर्भ कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर निमगडे, विधी विभाग विदर्भ अध्यक्ष ऍड. रजनीताई देवतळे, यवतमाळ महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.कल्पनाताई नागभीडकर, नागपूर जिल्हाध्यक्ष डॅनियल जोसेफ सर, अकोला जिल्हाध्यक्ष विजुभाऊ नावकार, गडचिरोली जिल्हाध्यक्ष गिरीश कोरामी, यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.



