अबब! त्याने चक्क 16 मोटारसायकल चोरल्या

अबब! त्याने चक्क 16 मोटारसायकल चोरल्या
वरोरा तालुक्यातील गाव उमरी पोस्ट जामनी येथील मयुर पुरुषोत्तम मेश्राम वय 23 वर्षे याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील विविध प्रकारच्या 16 मोटरसायकल चोरल्याने तो सदर गुन्ह्यामधे जेल मध्ये असताना वरोरा पोलिसांनी चौकशी साठी त्याला ताब्यात घेतले असता असे माहीत झाले की सिंदेवाही तालुक्यातील रविंद्र मनोहर बोरकर रा. सरडपार यांची हिरो एच एफ डीलक्स MH 34 AX 7427या क्रमांकाची मोटार सायकल 2017 मध्ये यानी चोरली होती ती 3 वर्षानंतर परत मिळाली सदर गुन्ह्यात सिंदेवाही पोलिसांनी वरोरा पोलिसांकडून त्याला चौकशीत घेतले असुन त्याने अशी कबुली दिली की आजपर्यंत मी अनेक तालुक्यातुन 16 मोटार सायकली चोरी केल्या सहज गमतीने विचारले चार चाकी चोरली नाही का तर त्याने चार चाकी चालवीता येत नसल्याने चोरली नाही असे सांगितले चौकशी अन्ती सिंदेवाही पोलिसनी ह्या शातिर चोराला चंद्रपुर जेल ला रवाना केले