जेसीआई राजुरा रॉयल्स द्वारा ब्लड बैंक कर्मचार्यांचा सत्कार.

विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार 8855994001
जेसीआई राजुरा रॉयल्स द्वारा ब्लड बैंक कर्मचार्यांचा सत्कार
जेसीआई राजुरा रॉयल्स द्वारा ब्लड बैंक कर्मचार्यांचा सत्कार
” रक्त दान हेच श्रेष्ठ दान ” असे म्हणतात,
परंतु या प्रक्रियेमध्ये रक्तदाता जितका महत्वाचा असतो तेवढाच त्या रक्ताला साठवुन , सुरक्षित ठेवणारे ब्लड बँक चे कर्मचारी असतात.
कोव्हिड 19 च्या महामारी काळात सुद्धा ज्यांनी आपली सेवा अविरत ठेवली, आणि ज्यांच्या प्रयत्नामुळे अनेक लोकांचे जीव वाचले अश्या कोरोना योद्धांचा सन्मान करण्याची संधी समाज कार्यात तत्पर असणाऱ्या जेसीआई राजुरा रॉयल ला प्राप्त झाली.
चंद्रपूर येथील प्रसिद्ध चिकित्सक डॉ. विलास मुळे यांच्या “अंकुर ब्लड बँक ” येथे जेसीआय राजुरा रॉयल्स द्वारा “सल्यूट टू सायलेन्ट वर्कर ” या थीम अंतर्गत डॉ. विलास मुळे , डॉ. नीलिमा मुळे व ब्लड बँकेत काम करणाऱ्या अनेक कर्मचार्यांचा सत्कार जेसीआई राजुरा रॉयलच्या अध्यक्षा जेसी सुष्मा शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी स्वतंत्र कुमार शुक्ला,त्रिशा शुक्ला तसेच ब्लड बैंकचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.कार्यक्रमाचे आयोजन जेसी सुष्मा शुक्ला यांनी केले.