*पोंभूर्णा तालुक्यात अवैध रेती तस्करी माफियाचा महापूर*
*🔴पोंभूर्णा तालुक्यात अवैध रेती तस्करी माफियाचा महापूर*
*🔴तहसीलदार साहेब… आता तरी लक्ष देणार का..?*
*🔴श्री रुपेश मंकिवार सामाजिक कार्यकर्ता निवेदनातून तक्रार*
दि.4.11.2020 रोज बुधवार ला
सामाजिक कार्यकर्ता श्री रुपेश मंकीवार त्यांनी पोंभूर्णा तालुक्यात अंधारी नदीवर अवैध रेतीचा तस्करी होत असल्याची तक्रार तहसिलदार साहेब यांच्याकडे केली आहे
पोंभूर्णा तालुक्यात रेती घाटाचा लिलाव झालेला नाही, शासनाच्या महसूल ची नुकसान होतआहे,याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे.
तालुक्यात अंधेरी नदीच्या घाटावर नवीन रस्ते तयार करून रात्र- बेरात्र रेती माफियानी जे.सी.बी.मशीनद्वारे अवैध उत्खनन करून टँक्टर मध्ये रेतीची अवैध वाहतूक करित आहे, शासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई का होत नाही, प्रशासनाकडून रेती माफियांना सहकार्य असल्याचे समजते ?
त्यामुळे नदीचा प्रवाह दिवसेंदिवस कमी होत आहे,रेती माफिया हे दिवसेंदिवस मालामाल होत चालले आहे, याकडे प्रशासनाने जातीने लक्ष देऊन अवैध रेती तस्करी माफियावर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.



