Vidarbh24News

Latest Online Breaking News

*राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांचा शेतकरी संघटना राजुरा तर्फे निरोप समारंभ..*

✍️विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार.

*राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांचा शेतकरी संघटना राजुरा तर्फे निरोप समारंभ..*

राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांची गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा पोलीस उपविभागात उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली असून शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. माजी आमदार एड. वामनराव चटप यांचे हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना एड. वामनराव चटप म्हणाले की, कर्तव्यदक्ष व आपल्या कामाप्रती निष्ठा ठेऊन सामान्य जनतेची कामे सचोटीने करणारा अधिकारी सर्वानाच हवाहवासा वाटतो. तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांचे नंतर स्वप्नील जाधव हे वरिष्ठ अधिकारी बदली होऊन जात आहेत. डीवायएसपी स्वप्नील जाधव यांनी या भागातील कायदा व व्यवस्थेची स्थिती चांगल्या रीतीने सांभाळली. यावेळी त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी एड. मुरलीधर देवाळकर, रमेश नळे, मधूकर चिंचोलकर, दिलीप देरकर, विश्वास साळवे, कपिल इद्दे, बळीराम खुजे, हसन रिझवी, बंडू देठे, सय्यद शौकत अली, पुंडलिक वाढई, जुबेर शेख, सूरज गव्हाणे, मतीन शेख यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!